He put the tractor on his cousin's body
He put the tractor on his cousin's body 
अहमदनगर

चुलत्याला ट्रॅक्‍टरखाली चिरडले, जमिनीचा वाद

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : जमिनीच्या वादातून अंगावर ट्रॅक्‍टर घालून पुतण्याने चुलत्याचा खून केला. अकोला येथे आज दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. 

तालुक्‍यातील अकोला येथे दोन भावामध्ये जमीनीच्या वाद झाला. याच रागातुन पुतण्याने चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्‍टर घालून चिरडले. ही घटना रविवारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. बाबासाहेब ऊर्फ पिंट्या देवराम गिरी (वय 40) असे मृताचे नाव आहे. तुळशीराम दत्तात्रेय गिरी असे आरोपीचे नाव अाहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

अकोला येथील मृत पिंट्या ऊर्फ बाबासाहेब देवराव गिरी व त्यांचा थोरला भाऊ दत्तात्रेय देवराव गिरी वस्तीवर राहत आहेत. रविवारी दुपारी दोघा भावात दत्तात्रेय गिरी यांच्या वस्तीवर जमिनीच्या कारणावरुन किरकोळ वाद झाले. त्यानंतर बाबासाहेब गिरी त्याच्या घरी गेला. बाबासाहेब गिरी यांच्या वस्तीवर दत्तात्रेय गिरी याचे ट्रॅक्‍टर उभे होते. पिल्या ऊर्फ तुळशीराम दत्तात्रेय गिरी चुलते बाबासाहेब यांच्या घरी गेला.

ट्रॅक्‍टर चालू केला. वडील व चुलत्यामध्ये झालेल्या वादाचा राग डोक्‍यात धरुन घरासमोर झोपलेल्या बाबासाहेब यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर घातला. पोटावरुन टॅंक्‍टरचे चाक गेल्याने बाबासाहेब गिरी हे गंभीर जखमी झाले. 
नातेवाईकांनी गिरी यांना तात्काळ उपचारासाठी पाथर्डी येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, ते जागीच ठार झाले होते. ह्या घटनेत झटापटीत इतर तिघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक मंदार जवळे व पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी तातडीने सहकाऱ्यासह घटनास्थळी गेले. 

पोलिसांनी आरोपी पिल्या उर्फ तुळशीराम दत्तू गिरी यास ट्रॅक्‍टरसह ताब्यात घेतले. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड तपास करीत आहेत. खुनाचे कारण जमीनीचा वादच आहे की आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT