Rajesh tope esakal
अहिल्यानगर

...अन् आरोग्यमंत्री टोपे रमले बालपणीच्या आठवणीत!

निलेश दिवटे

कर्जत (जि. अहमदनगर) : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कर्जत तालुक्यातील दिघी या मामाच्या गावाला आवर्जून भेट देत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, तेथील निंबाळकर परिवारातील सर्व सदस्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. ग्रामस्थांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांचा साधेपणा ग्रामस्थांना भावला. अनेक वर्षांपूर्वी दिवाळीच्या सुटीत मामाच्या गावाला आल्यानंतर त्या काळच्या आठवणी, संवंगड्यांची नावे, तसेच जेथे बोरे, आंबे, चिंचा खाल्ल्या, ज्या विहिरीत पोहले, ते शेत आणि गोट्या खेळलेले मारुती मंदिराचे प्रांगण प्रत्यक्षात जाऊन पाहिले आणि तोंडपाठ नावे सांगितली.

आणि आजोळी जाण्याची झाली इच्छा

तालुक्यातील सीना नदीकाठी वसलेल्या दिघी येथील माजी मंत्री (कै.) आबासाहेब निंबाळकर यांच्या पुतणी व (कै.) निवृत्ती निंबाळकर यांच्या कन्या शारदा टोपे (आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातुःश्री) यांचे दिघी हे माहेर. टोपे हे कामानिमित्त बारामती येथे गेले होते. दिघी हे त्यांच्या मामाचे गाव. बारामतीहून राशीनमार्गे परतत असताना त्यांना आजोळी जाण्याची इच्छा झाली. काल (ता. ३) सायंकाळी त्यांच्या वाहनांचा ताफा दिघी येथे पोचला. आरोग्यमंत्री आल्याने ग्रामस्थांना सुखद धक्का बसला. जुन्या आठवणी, मित्रांना भेटून आनंद झाला. फेट्यावाले आबा नाना यांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन, कर्जत बाजार समिती संचालक औदुंबर आप्पासाहेब निंबाळकर यांच्या घरी थांबून कुटुंबासोबत विचारपूस केली. बालपणीच्या मित्रांना भेटून आनंद झाला. मारुती मंदिर येथे दर्शनाला गेल्यावर बालपणी मंदिरासमोर मित्रांसोबत गोट्या खेळायचे. विहीर, नदीत पोहायचे, सूरपारंब्या खेळायचे याची आठवण झाली. दिघी गावातील विकासकामे व अडचणींवर ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. औदुंबर निंबाळकर यांच्या घरी त्यांच्या आई (मंत्री टोपे यांच्या आजी सुलभा आप्पासाहेब निंबाळकर), चुलती प्रतिभा दादासाहेब निंबाळकर) यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.


''इथे आल्यावर मोठे समाधान लाभले. मामाच्या गावाची जागा हृदयात वेगळी असते. येथे येण्याची ओढ होती, मात्र कामाच्या व्यापात शक्य होत नव्हेत. अखेर आज योग जुळून आला.''
- मंत्री राजेश टोपे

''नातू राजेश टोपे महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोग्यमंत्री झाला. लहानपणी नियमित दिवाळी सुटीमध्ये दिघीला यायचा. मात्र, पुढे कामाच्या व्यस्ततेमुळे येणे-जाणे कमी झाले, मात्र फोनवरून खुशाली विचारायचा. टीव्हीवर नियमित पहायचे, मात्र आज तो प्रत्यक्ष भेटीला आला आणि खूप आनंद झाला. - सुलभा निंबाळकर

या वेळी औदुंबर निंबाळकर, आबा निंबाळकर, सुहास निंबाळकर, राजेश निंबाळकर, अविनाश निंबाळकर, धनंजय निंबाळकर, मनोहर खरात, शिवाजी देवकर, दत्ता गोयकर, काका भोयटे, अक्षय निंबाळकर, धनंजय इंगळे, नागेश
निंबाळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT