If Vijay Wadettiwar is not expelled from the cabinet a morcha will be held at Congress Bhavan 
अहिल्यानगर

विजय वडेट्टीवार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी न झाल्यास काँग्रस भवनावर मोर्चा

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : मराठा समाज व ओबीसी समाज यांच्यात वाद लावण्याचे काम करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करा, या मागणीसाठी दिल्लीतील काँग्रेस भवनावर शेतकरी मराठा महासंघाचे वतीने संभाजीराव दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राज गवांदे व तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेले निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार सर्व समाज बांधव गुण्यागोविंदाने राहत आहे. मराठा समाजाने वडीलकीच्या नात्याने या समाजाला कधीही दुजाभावाची वागणूक दिली नाही. राज्यात दलित, अदिवासी, ओबीसी समाजाच्यामध्ये कधीही वादविवाद नाही. राज्यातील यशवंतराव चव्हाण यांचेनंतर वसंतराव नाईक, अ. र. अंतुले, सुशीलकुमार शिंदे यासारखे मुख्यमंत्री झाले. परंतु राज्यात कधीही दुफळी माजवली नाही. मात्र या मंत्रिमंडळात काही मंत्री विनाकारण समाजात वाद लावणारे वक्तव्य करीत आहे.

महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलने होत आहे. हे आरक्षण कोणत्याही मराठा नेत्यांनी अथवा समाजातील घटकांनी ओबीसीमध्ये द्या, अशी मागणी केलेली नाही. आम्ही कोणाच्याही अधिकारावर गदा आणीत नाही. कोणाच्याही हिश्यात वाटेकरी होत नाही. कोणाचे कमी करून आम्हाला द्या असाही मराठा समाज मागत नाही. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या अशीही मागणी केलेली नाही. आम्ही आमच्या हक्काचं मागतो. मग ओबीसी नेत्यांच्या पोटात का पोटसुळ उठला असून बेताल वक्तव्य करून दोन समाजात दुही माजवून देत आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते राज्यातील इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार हे जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या विरोधात वक्तव्य करत असतात. ओबीसी समाजाला मराठा समाजा विषयी राग निर्माण होईल, असे बेताल बोल काढीत असतात. पंडित नेहरू, इंदिरा गांधींच्या विचारांची काँग्रेस रसातळाला नेण्याच्या मार्गावर हे मंत्री आहेत.

विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातुन हकालपट्टी न केल्यास २१ नोव्हेंबरला नवी दिल्लीतील काँग्रेस भवनावर मोर्चा काढण्याचा इशारा मराठा महासंघाचे अकोले तालुका उपाध्यक्ष अशोक आवारी, भाऊसाहेब हाडवळे, सचिव शिवाजी पाटोळे, संयुक्त चिटणीस बाळासाहेब कोकाटे, खजिनदार सुशांत वाकचौरे, युवक प्रतिनिधी अक्षय आभाळे, विद्यार्थी प्रतिनिधी अमोल मोरे, महिला प्रतिनिधी वर्षा चौधरी, जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कदम, अमोल येवले, अविनाश तळेकर, संदीप शेळके यांनी दिला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT