JCB dug the Kukdi canal at Shrigonda
JCB dug the Kukdi canal at Shrigonda 
अहमदनगर

श्रीगोंद्यात कुकडी कालवा जेसीबीने लावून फोडला, दरवर्षीच घडते घटना

संजय आ. काटे

श्रीगोंदे : "कुकडी'चे आवर्तन अंतिम टप्प्यात असताना तालुक्‍यातील सर्वांत मोठी वितरिका 132चा पोटकालवा काल बुधवारी जेसीबी यंत्र लावून फोडला. अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ता नव्हता. शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी या प्रकाराचा पर्दाफाश केल्यानंतर जलसंपदा विभाग जागा झाला आणि संबंधितांवर कारवाईची भाषा सुरू झाली. 

"कुकडी'चे शेती सिंचनासाठीचे आवर्तन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पिकांकडे दुर्लक्ष करून "कुकडी'च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी किलोमीटर 132वरील जोडकालवा श्रीगोंदे शिवारात फोडून एका तलावात पाणी सोडले. या अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई केली नाही, तर अधिवेशन काळात मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा शेतकरी नेते राजेंद्र काकडे यांनी दिला.

लोणी व्यंकनाथ, घारगाव, पारगाव, श्रीगोंदे, बाबुर्डी, शिरसगाव, म्हातारपिंप्री शिवारातील शेतकरी "कुकडी'च्या पाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना थेट पाणी न देता तलावात पाणी सोडण्याचे उद्योग सुरू आहेत. "कुकडी'चे हे आवर्तन फक्त शेती सिंचनासाठी आहे. कोणत्याही तलावात पाणी सोडू नये, असे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले. मात्र, अधिकाऱ्यांनी या निर्णयाला केराची टोपली दाखविली.

दरम्यान, कालवा फोडण्याचा प्रकार काकडे यांनी सोशल मीडियातून समोर आणल्यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत धारेवर धरले. दरम्यान, काकडे यांनी, याप्रकरणी शेतकऱ्यांना बळीचा बकरा करू नका; यात सामील असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करा, अशी मागणी केली. अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT