Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

Shreyas Talpade: हृदयविकाराच्या झटक्याबद्दल आता एका मुलाखतीत श्रेयसनं सांगितलं आहे. यावेळी बोलताना श्रेयसनं कोविड-19 (COVID-19) च्या लसीचा उल्लेख देखील केला.
Shreyas Talpade
Shreyas Talpadeesakal

Shreyas Talpade: मराठी सिनेसृष्टीसोबत हिंदी सिनेसृष्टीतही विशेष ओळख निर्माण करणाऱ्या श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हृदयविकाराचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयसवर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आता श्रेयस पूर्णपणे बरा झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याबद्दल आता एका मुलाखतीत श्रेयसनं सांगितलं आहे. यावेळी बोलताना श्रेयसनं कोविड-19 (COVID-19) च्या लसीचा उल्लेख देखील केला. मुलाखतीत त्यानं केलेल्या एका वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

श्रेयस म्हणाला, "मला मधुमेह नाही, मला रक्तदाबाचा त्रास नाही, मग हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय असू शकते?"

एका मुलाखतीत श्रेयस तळपदेने त्याच्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल सांगितले आहे. यावेळी तो म्हणाला, "मी महिन्यातून एकदाच ड्रिंक करतो. तंबाखू खात नाही. माझ्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण थोडे जास्त होते. पण मला सांगण्यात आले की, आजकाल हे नॉर्मल आहे. मी त्यासाठी औषधे घेत होतो आणि ते कमी देखील झाले होते. मला मधुमेह नाही, मला रक्तदाबाचा त्रास नाही, मग हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय असू शकते?"

पुढे श्रेयस म्हणाला, "एवढी काळजी घेतल्यानंतरही असं होऊ शकत असेल, तर याचं कारण काहीतरी वेगळंच आहे. मी हा theory नाकारणार नाही. पण COVID-19 लस घेतल्यानंतर मला थोडा थकवा जाणवू लागला होता. हे कोविड किंवा लसीमुळे असू शकते, ही शक्यता नाकारता येणार नाही."

जेव्हा श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आणि कोविड लस यांचा संबंध असल्याचा संशय आला तेव्हापासून ते यावर अधिक संशोधन करत आहे. तो याबाबत पुढे म्हणाला, "आपण आपल्या शरीरात काय घेतले आहे, हे खरोखर माहित नाही. आपण कंपनीवर विश्वास ठेवून इजेक्शन घेतलं." आता श्रेयसनं केलेल्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.

Shreyas Talpade
Shreyas Talpade: "क्या वाकई में…जो जैसा करता है…वैसा भरता है?"; श्रेयसच्या 'कर्तम भुगतम'चा टीझर रिलीज
Shreyas Talpade
Shreyas Talpade : 'ECG हा सर्वात मोठा जोक आहे'... श्रेयस तळपदे असं का म्हणाला

"मला हे जाणून घ्यायचे आहे की लसीने आपल्या शरीरावर काय परिणाम केला आहे. मला याची खात्री नाहीये की, मला हृदयविकाराचा झटका कोविड किंवा लसीमुळे आला आहे. माझ्याकडे कोणताही ठोस पुरावा असल्याशिवाय काहीही बोलणे व्यर्थ ठरेल. पण मला हे जाणून घ्यायचे आहे की या लसीचा आपल्या शरीरावर कसा परिणाम झाला आहे?", असंही श्रेयस म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com