उजनी डॅम ई सकाळ
अहिल्यानगर

उजनीतून पाणी उचलण्याचा निर्णय रद्द झाल्याने कर्जतकर खुश

इंदापूर तालुक्यासाठी नेले जाणार होते पाणी

दत्ता उकिरडे

राशीन : उजनी धरण क्षेत्राच्या फुगवटयातून पाच टीएमसी पाणी उचलून इंदापूर तालुक्‍यातील (indapur taluka) शेटफळ गडे येथील पाणीउपसा सिंचन योजनेला नेण्याचा घाट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून घातला जात होता. त्यामुळे सोलापूर आणि नगर जिल्ह्यात गदारोळ झाला. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तो आदेश रद्द केला आहे.

इंदापूरच्या खडकवासला (khadakvasla dam) कालव्यात उजनीचे पाच टीएमसी पाणी सोडण्याच्या योजनेचे सर्वेक्षण करण्यास मंजुरी मिळाली होती. निर्णय रद्द झाल्याने कर्जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांसह पाणी योजनांसाठी अवलंबून असणाऱ्या गावांनीही सुस्कारा सोडला आहे. (Karjatkar is happy with the decision to take water from Ujani dam)

22 एप्रिल रोजी उजनीतून पाणी उचलण्याच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या बैठकीत सर्वेक्षणाकरिता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजुरी दिली होती. याच मंजुरीच्या विषयावर कर्जत तालुक्‍यातील खेड, भांबोरे, बारडगाव सुद्रिक, शिंपोरे आदी ग्रामपंचायतींनी तातडीने तहसीलदार नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे यांना निवेदने देऊन विरोध दर्शविला होता. भीमा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना जबाबदार धरले होते.

पाणी उचलल्याने उजनीच्या फुगवटयावर अवलंबून असलेल्या कर्जत तालुक्‍यातील अनेक गावांच्या पाणी योजनांवर सक्रांत येणार होती. या पाणीयोजना आठमाहीच झाल्या असत्या. तसेच भीमा नदीचा बागायती पटट्यातील शेती अडचणीत येणार होती. भीमा नदीच्या किनाऱ्यावरील पुनर्वसित गावांनाही याचा फटका बसणार होता. त्यामुळे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असते. कोरोनाच्या काळात आरोग्य विभागावर आर्थिक ताण असताना या योजनेसाठी सहाशे कोटी खर्च करण्याचा घाट कशासाठी असा सवालही यानिमित्ताने उपस्थित करण्यात आला होता.

कर्जत-करमाळ्याचा विरोध

उजनीतून पाणी उचलण्याचा निर्णयास कर्जत-करमाळा तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केलेला विरोध आणि याप्रश्‍नी शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन, पाणी उचलण्याच्या निर्णय घेण्यात आघाडीवर असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनाच हा निर्णय रद्द करावा लागल्याने कर्जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी सुस्कारा सोडला आहे. (Karjatkar is happy with the decision to take water from Ujani dam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कोल्हापुरात माॅन्सूनचे धडाक्यात पुनरागमन; पुढच्या काही तासांत मुंबईसह अमरावती, कोकणात पावसाचा जोर वाढणार; कुठे ऑरेंज तर कुठे येलो अलर्ट

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला आज विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार

Ketan Agarwal Killed Case : घटनास्थळी प्रसंगाची पुनर्निर्मिती; लोहगडावर पुतळ्याच्या साह्याने गुन्ह्याची अडीच तास पुनर्तपासणी

Anant Ambani : अनंत अंबानी यांची तिरुमलात सुप्रभात सेवा

Iran America War : आखातात पुन्हा भडका! बहारीन, कुवेतवर क्षेपणास्त्र हल्ले; अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणचे चोख उत्तर

SCROLL FOR NEXT