लाचेच्या जाळ्यात
लाचेच्या जाळ्यात sakal
अहमदनगर

कोपरगाव : दोन अधिकारी लाचेच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : तालुक्यातील कोळपेवाडी येथील दारूच्या दुकानदाराकडून दारूविक्री व वाहतूक सुरू ठेवण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बाभळेश्‍वर कार्यालयात कार्यरत असलेले सहायक दुय्यम निरीक्षक राजेंद्र भास्कर कदम व सहायक दुय्यम निरीक्षक नंदू चिंधू परते या अधिकाऱ्यांनी तक्रारदारास कारमधून अवैध दारूची वाहतूक करताना पकडले होते. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पकडलेली कार सोडविण्यासाठी तक्रारदार न्यायालयात गेला असता, कदम व परते यांनी त्याला, दारूविक्री व वाहतूक करावयाची असेल तर दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगत ६० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीत ही रक्कम ३५ हजारांवर आली.

हे पैसे सोमवारी (ता. २७) आणून देण्यास सांगितले होते. तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांनी पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्यासह पथकाला घेऊन बुधवारी (ता. २९) सायंकाळी चार वाजता कोळपेवाडी येथे सापळा लावला.यावेळी लाचखोर अधिकाऱ्यांना पंचांसमोर लाच घेताना अटक केली. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT