Kothale Balthan Titvi Irrigation in Akole taluka filled up 
अहिल्यानगर

Video : अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायम; ‘या’ धरणात ऐवढा पाणीसाठा

शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : कोथळे, बलठन, टिटवी लघुपाटबंधारे पाण्याने भरले तर भंडारदरा धरणाने ७० टक्के पार केले आहेत. येथे अजूनही पाऊस सुरू असून घाटघर येथे पाच इंच तर रतनवाडी येथे चार इंच पावसाची नोंद झाल्याने भंडारदरा जलाशयात पाण्याची आवक वेगाने होत आहे.

जलाशयात २६९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाल्याने ७७१७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यामुळे ७० टक्के जलाशय भरले आहे. वाकी जलाशयात ११२. ६६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून ७८९ क्यूसेसने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कृष्णवंती वाहत असून रंधा धबधबा अवतीर्ण होऊन निळवंडे जलाशयात पाण्याची आवक ६४ दशलक्ष घनफूट झाली. ४९०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. ५८. ८४ टक्के जलाशय भरले आहे. तर मुळा नदीतून २६३५ क्युसेक्सने प्रवाह सुरु आहे.

तालुक्यातील आंबित १९३, देव हंडी १५५, पिंपळगाव खांड ६००, वाकी ११२ हे जलाशय भरले आहे. दोन दिवसापूर्वी कोथळे १८२ दशलक्ष घनफूट, टिटवी ३०३ दशलक्ष घनफूट व बलठण २०२ दशलक्ष घनफूट क्षमतेचे लघु पाटबंधारे प्रकल्प भरले आहेत,  अशी माहिती जलसंपदाचे अभिजित देशमुख यांनी दिली आहे. 

कुमशेत येथील नऊ बंधारेही भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे मुळा व भंडारदरा पाणलोट क्षेत्रात अधिक वेगाने शेतीची कामे सुरु आहे. जनावरांनाही मुबलक चारा उपलब्ध झाला आहे. भंडारदरा व निळवंडे जलाशयात पाण्याची आवक सुरु झाल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी खुश आहेत. निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी मात्र कोरोनाची वक्रदृष्टी असल्याने पाटबंधारे, वनविभाग व पोलिस, महसूल, स्थानिक प्रशासन पर्यटक येऊ नये म्हणून दक्ष आहेत. त्यामुळे धबधबे व जलाशयावर गर्दी दिसत नाही.

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT