The little girl told the story in the isolation room 
अहिल्यानगर

बाधित लेकीसाठी वडीलही मरणाच्या दारात... कोरोनामुक्त चिमुरडीने सांगितली आपबिती

दत्ता उकिरडे

राशीन : ''माझं काहीही झाले तरी चालेल...पण ती बरी झाली पाहिजे...यासाठी मी निगेटिव्ह असतानाही पॉझिटिव्ह असलेल्या माझ्या मुलीसोबत कोरोनाचे रुग्ण असलेल्या वार्डमध्ये नऊ दिवस राहिलो. मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्याशी आम्ही बाप-लेक मोठ्या धैर्याने लढलो, ही हिम्मत मला माझ्या चिमुरड्या लेकीनेच दिली,'' ही आपबिती कोरोनातून मुक्त झालेल्या सहा वर्षीय चिमुरडीच्या पित्यानेच सकाळला सांगितली.

केवळ कोरोनाची लागण झाल्याची माहिती समजली तरी लोकांचा निम्मा जीव जातो. मी जगणार की नाही,अशी चिंता त्यांना सतावत राहते. परंतु या राशीनमधील त्या चिमुरडीने दाखवलेली हिंमत दाद देण्यासारखी आहे. कोणतेही टेन्शन न घेता ती अलगीकरण कक्षात राहिली. कोरोनाबाधित पेशंट असेल तर त्या कक्षात कोणालाच राहू देत नाहीत. परंतु या चिमुरडीचे वय पाहता ती एकटी कशी त्या कक्षात राहील. तिची मानसिकता काय असेल, या विचारानेच तिचे पालक हादरून गेले होते. कारण दोनच दिवसांपूर्वी त्या चिमुरडीच्या आजीचा कोरोनाने मृत्यू झाला होता. सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली होती.

रोनावर मात केलेल्या चिमुरडीच्या वडिलांनी सकाळशी बोलताना आपल्या भावना आणि या कठीण काळातील अनुभव कथन केला. ते म्हणाले, कोरोनाची बाधा झाल्याने सहा वर्षांच्या लेकराला उपचारासाठी एकटीलाच नेणार याचीच मला खूप भीती वाटली होती. म्हणून मी निगेटिव्ह असतानाही तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. हॉस्पिटलच्या प्रशासनाने माझ्याकडून लिहून घेतले. तिला आधार देण्याची गरज होती.  

या कठीण परिस्थितीत माझ्या लेकरानेच, मला काहीही होणार नाही, यातून आपण बरे होऊन मला येथून बाहेर जायचे आहे, असे सांगून अनेकवेळा मलाच धीर दिला. तिचा आत्मविश्वास दांडगा होता. परंतु मीच हबकून गेलो होतो. त्या कक्षातील प्रत्येक क्षण मला वर्षासारखा वाटत होता. काहीही झालं तरी ते लेकरूच. तिला तिच्या आईची आणि बहिणीची आठवण यायची. कोरोना गेल्यावर आपण त्यांना भेटू, असे सांगून तिला त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलू द्यायचो.
हॉस्पिटलमध्ये एकाच रूममध्ये अंतर ठेऊन आमच्या दोघांचे बेड होते.

मन रमवण्यासाठी दिवसभर ती मोबाईल गेम खेळायची, डॉक्टर, नर्स यांच्याशी बोलायची. माझ्याशी गप्पा मारायची आणि रात्री तिला कुशीत झोपायची सवय होती. मात्र, इथे ती एकटीच झोपायची. रात्री दोन- तीन वाजले तरी मला झोप यायची नाही, अशा वेळेत हॉस्पिटलच्या प्रांगणात चकरा मारायचो..

एकदा जवळच्याच इमारतीत राहत असलेल्या नर्सने एकदा मी फिरत असताना पाहिले. इतक्या रात्री येऊन त्यांनी काही त्रास होतोय का तुम्हाला, अशी आस्थेवाईकपणे चौकशी केली. तेव्हा खूप बरं वाटलं. बूथ हॉस्पिटलमधील प्रशासन आणि सर्व स्टाफ दक्ष आहे. ते रुग्णांची खूप चांगली काळजी घेतात, असेही ते सांगत होते.

माझ्या मुलीस मीच आंघोळ घालायचो, तिचे कपडे मीच धुवायचो. मात्र, धुतलेले कपडे ती सुकत घालायची, स्वतः चे बेड व्यवस्थित करायची, तोंडाला मास्क ठेवायची, मधून- मधून सारखी सॅनिटायझरने वापरायची, हात धुवायची. हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या जेवणात कधी कच्च्या चपात्या असायच्या, लाल मसाला टाकलेला भात असायचा, डाळ- भात असायचा, तिचे पोट दुखू नये म्हणून मी तिला चांगला शेकलेल्या चपात्याचा भाग द्यायचो. ती लहान होती पण तिनेच आम्हाला हिम्मत दिली, समजूतदारपणा दाखवला, म्हणूनच हा कठीणकाळ पार पडला. ती जिंकली आणि कोरोना हरला.

हा काळ कठीण आहे. परंतु प्रत्येकाने हिंमत दाखवली पाहिजे. आपण कणखर राहिलो तर कोरोना आपले काहीही बिघडू शकणार नाही, असे ती कोरोनामुक्त चिमुरडी सांगते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

SCROLL FOR NEXT