Sujay Vikhe Patil vs MP Nilesh Lanke sakal
अहिल्यानगर

MP Nilesh Lanke : फेरमतमोजणीत काही निष्पन्न होणार नाही

अहमदनगर दक्षिण मतदार संघातील काही मतदान केंद्रांवरील मतांची फेरमतमोजणी करण्यासाठी भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. विखे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

पारनेर - ईव्हीएम मशिनबाबत वास्तविक आम्ही तक्रार करायला हवी होती. देशात तुमचे सरकार आहे आणि तुम्हीच यंत्रणेवर अविश्‍वास दाखवत असाल, तर याचा अर्थ तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाहीत. त्यांच्या आजोबांनीही तेच केले, अशी प्रतिक्रिया खासदार नीलेश लंके यांनी भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी फेरमतमोजणीच्या मागणीवर त्यांचे नाव न घेता दिली.

अहमदनगर दक्षिण मतदार संघातील काही मतदान केंद्रांवरील मतांची फेरमतमोजणी करण्यासाठी भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. विखे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्यावर मॉक पोल घेण्यात येणार असल्याबाबत पत्रकारांशी बोलताना खासदार लंके यांनी हंगे येथे आज बोलताना दिली.

ते म्हणाले की, मॉक पोल घेतला, तरी माझा निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर शंभर टक्के विश्‍वास आहे. या यंत्रणेमध्ये फेरफार, बदल होत नसतो. लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी निवडणूक आहे. या यंत्रणा, मशिन मॅनेज होत असत्या, तर लोकांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केले नसते. फक्त मशिन मॅनेज केले असते, असा टोलाही लंके यांनी लगावला.

एकाही मतदान केंद्रावर गडबड आढळणार नाही. निवडणूक आयोगाची ही यंत्रणा आहे. प्रत्येक मशिन मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्याची तपासणी केली जाते. मॉक पोल घेतला जातो. त्यानंतर ते मतदान मोजले जाते व त्यानंतरच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू करण्यात येते. त्यामुळे कोठेही हेराफेरी होणार नाही. मग त्यावर चर्चा कशाला, असा सवाल लंके यांनी केला.

निवडणुकीच्या काळात यंत्रणा मॅनेज करायची आणि निवडणुकीला सामोरे जायचे, असे त्यांचे काम आहे. आता फेरमतमोणीची मागणी म्हणजे रडीचा डाव आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे.

- नीलेश लंके, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT