Sarika and Bahiru Dagale sakal
अहिल्यानगर

Akole Crime : प्रॉपर्टीचा मोह! सावत्र आईने केला सुनेसह मुलाचा खून; चौघांवर गुन्हा दाखल, दोघे अटकेत

आपल्या मुलाच्या प्रॉपर्टीत पहिल्या बायकोचा मुलगा वाटेकरी होऊ नये, म्हणून वडील आणि सावत्र आईने कट रचून मुलगा आणि सुनेची हत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

अकोले - आपल्या मुलाच्या प्रॉपर्टीत पहिल्या बायकोचा मुलगा वाटेकरी होऊ नये, म्हणून वडील आणि सावत्र आईने कट रचून मुलगा आणि सुनेची हत्या केली. पोलिस तपासात दुहेरी हत्याकांडाची माहिती तपासात समोर आली. याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात काळू काशिनाथ डगळे, हिराबाई काळू डगळे, संतोष काशिनाथ डगळे आणि काशिनाथ लक्ष्मण डगळे (रा. खिरविरे, ता. अकोले) या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

तालुक्यातील खिरविरे गावच्या आंबेविहिरवाडी शिवारातील नवविवाहित पती-पत्नीचे मृतदेह ४ जुलैला विहिरीत आढळून आले होते. बहिरू काळू डगळे (वय २५) व सारिका बहिरू डगळे (क्य २२) या पती-पत्नीचे मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. एकमेकांना घट्ट मिठी मारून बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आले होते. प्रथमदर्शनी जोडप्याने आत्महत्या केल्याची चर्चा समोर आली.

मृतांचे पाडोशी (ता. अकोले) येथील मामा एकनाथ कुलाळ व नातेवाइकांनी आत्महत्या नसून घातपात असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली. पोलिस तपासात हा घातपात असल्याचे समोर आले. सावत्र आईनेच मुलाचा सुनेसह खून केल्याचे तपासात उघड झाले. वडील व त्याची सावत्र आई यांनी कट रचून प्रॉपर्टीसाठी खून केल्याचे समोर आले. यातील दोन आरोर्पीना तत्काळ अटक करण्यात आली.

दोन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

या घटनेतील मृत बहिरू व सारिका बहिरू डगळे यांचा विवाह दोन महिन्यांपूर्वीच झाला. १ जुलैला हे जोडपे हरवल्याची तक्रार अकोले पोलिसात दाखल करण्यात आली. तीन दिवसांनंतर ४ जुलैला डगळे यांच्या घराजवळच्या विहिरीत दोघांचे मृतदेह एकमेकांना घट्ट कपड्यांनी बांधलेल्या अवस्थेत पाण्यात आढळले. मृतदेहांवर आढळून आलेल्या जखमांमुळे हा प्रकार आत्महत्येचा नसून वेगळा असल्याचा संशय पोलिसांनाही होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT