A man from Pune was robbed at Jamkhed 
अहिल्यानगर

पुण्याच्या व्यक्तीला स्वस्तात सोने पडले महागात

वसंत सानप

जामखेड : पुण्यातील एका व्यक्तीस स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने तालुक्‍यातील पाटोदा गरडाचे येथे बोलाविण्यात आले. तेथे पंधरा ते वीस जणांच्या टोळीने या व्यक्तीला दहा लाख रुपयांना लुटले.

या व्यक्तीने जामखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पंधरा ते वीस जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही तालुक्‍यात अशा घटना घडल्या आहेत. त्या घटनांशी या घटनेचे साधर्म्य असल्याचे बोलले जात आहे. 

स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने हडपसर (पुणे) येथे राहणाऱ्या एका व्यक्तीस आरोपी अमोल (पूर्ण नाव समजले नाही), परमेश्‍वर काळे, रामा (पूर्ण नाव समजले नाही) व अन्य अज्ञात पंधरा ते वीस जणांनी, "आमच्याकडे सोने आहे; ते विकायचे आहे,' असे म्हणून संबंधित व्यक्तीचा विश्‍वास संपादन केला, तसेच त्यास जामखेड तालुक्‍यातील पाटोदा गरडाचे परिसरात 31 मार्च रोजी सकाळी सातच्या सुमारास बोलाविले. या वेळी आजूबाजूला पंधरा ते वीस जण दबा धरून बसले होते.

ही व्यक्ती आली तेव्हा दबा धरून बसलेल्या आरोपींनी घेराव घातला, तसेच तलवारीचा धाक दाखवून रोख 10 लाख 7 हजार रुपये व 7 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, असा एकूण 10 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज लुटला. 

संबंधित व्यक्तीने गुरुवारी (ता. 8) जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी पंधरा ते वीस जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश जानकर तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT