Ten years punishment
Ten years punishment  google
अहमदनगर

80 वर्षांच्या वृध्देवर आत्याचार, आरोपीस दहा वर्षांची शिक्षा

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या 80 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याबद्दल आरोपी नाना चंदू निकम (वय 21, रा. रतडगाव, ता. नगर) याला दहा वर्ष सक्‍तमजुरी आणि 28 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी ठोठावली.

नगर तालुक्‍यातील एका गावामधील महिला ता. 8 मार्च 2020 रोजी सकाळी साडे नऊ वाजता शेतातील विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळेस आरोपी नाना चंदू निकम हा तेथे आला. त्याने या महिलेच्या तोंडावर दगड मारून तिला खाली पाडले. तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारामुळे महिला ओरडली. शेतामध्ये जवळच असलेल्या दोन्ही सुना मदतीला धावून आल्या. या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नाना निकम याच्यावर अत्याचार करणे आणि दुखापत केल्याचा गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.

पोलिस उपनिरीक्षक धनराज जारवाल आणि नितेश राऊत यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठविण्यात आले. या खटल्यात सरकारतर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, तिच्या सुना, पोलिस उपनिरीक्षक जारवाल, राऊत, डॉ. प्रसाद सायगावकर, पोलिस कर्मचारी संतोष लगड, संभाजी बोराडे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. वैद्यकीय पुरावा, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरण्यात आल्या. अत्याचाराबद्दल दहा वर्ष सक्‍तमजुरी आणि 25 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्‍तमजुरी, दुखापत केल्याबद्दल सहा महिने सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवस सक्‍तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. अत्याचारीत वृद्धेला दंडापैकी 15 हजार रुपये देण्याचा आदेश देण्यात आला आहे. ऍड. मंगेश दिवाणे यांनी सरकारतर्फे काम पाहिले. पोलिस हेड कॉन्स्टेबल पोपट रोकडे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT