Marriage in Karjat stopped by police
Marriage in Karjat stopped by police 
अहमदनगर

नवरदेवाऐवजी पोलिस आले दारी, नवरीनेच केला होता व्हॉटसअॅप मेसेज

नीलेश दिवटे

कर्जत : घरच्यांनी तिच्या लग्नाचा घाट घातला. तिला पाहायला नियोजित वरासह त्याचे कुटुंबीय आले. मुलगी पसंत पडली, लग्नही ठरले; पण खूप शिकून अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. क्षणात सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्यामुळे तिने थेट जीवनच संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना पत्र लिहिले. त्यात तिच्यावर ओढवलेला प्रसंग कथन केला. यादव यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिचे घर गाठले.

मुलगी, तिच्या आई-वडिलांना विश्वासात घेत समजावून सांगितले. कायद्याचा धाक दाखविला. अखेर तिचे आई-वडील नमले. चूक कबूल केली. शिक्षण पूर्ण झाल्यावरच तिच्या मर्जीनुसार विवाह करण्याची ग्वाही दिली. मुलीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. खोळंबलेली शिक्षणाची वाट पुन्हा सुकर झाली. 

नव्याने रुजू झालेल्या पोलिस निरीक्षक यादव यांनी तालुक्‍यातील अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याच वेळी त्यांनी विविध शाळांना भेटी देत, तेथील विद्यार्थिनींशी संवाद साधला. छेडछाडीविरोधात धीटपणे पुढे येण्याचे आवाहन करीत वैयक्तिक मोबाईल क्रमांक दिला. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्याचा विश्‍वास दिला. 
दरम्यान, तालुक्‍यातील एका गावातील अल्पवयीन मुलीची शिकण्याची इच्छा असतानाही घरच्यांनी तिचे लग्न उरकण्याची तयारी केली. मनाविरुद्ध घडत असले, तरी तिच्यापुढे पर्याय नव्हता. अखेर कंटाळून तिने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी तिला पोलिस निरीक्षक यादव यांची आठवण झाली. 
मोठ्या धाडसाने तिने यादव यांना व्हॉट्‌सऍपवर सविस्तर पत्र लिहीत सर्व प्रकाराची माहिती दिली. पत्र वाचताच यादव यांनी तत्काळ दोन-तीन पोलिसांना साध्या वेशात सोबत घेत मुलीचे घर गाठले. तिच्या आई-वडिलांची समजूत घातली. मात्र, ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अखेर पोलिसी खाक्‍या दाखविताच ते नरमले. मुलीच्या इच्छेनुसार शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचा विवाह करू, असे कबूल केले. मुलीचा जीव भांड्यात पडला. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. 
दरम्यान, आई-वडिलांनाही चुकीची उपरती झाली. मुलीला कुशीत घेत मग त्यांनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ते पाहून पोलिस निरीक्षक यादव व उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पोलिसातल्या देवदूताला मुलीने हात जोडून धन्यवाद दिले. 

संबंधित अल्पवयीन मुलीने पत्र लिहून, लग्न न थांबल्यास आत्महत्या करणार असल्याचे नमूद केले होते. मी तिचे आई-वडील, नातेवाइकांना समजावून सांगितले. त्यांनी चूक मान्य करीत विवाह थांबविला. तिचे शिक्षण पुन्हा सुरू झाले. आजपर्यंत तालुक्‍यातील दोन अल्पवयीनांचे विवाह रोखले आहेत. 
- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, कर्जत , अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT