Marriage of a minor girl in Pathardi 
अहिल्यानगर

नवरी अकरा वर्षांची, नवरा पंचवीस वर्षांचा...व्यसनी बापाचा प्रताप

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी ः शिरापूर येथे बापानेच अकरा वर्षे वयाच्या मुलीचा साखरपुडा पंचवीस वर्षे वयाच्या पुरुषाबरोबर करुन बालविवाह लावण्याचा प्रयत्न केला. या बाबत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार नोंदविली आहे. मुलीचा बाप, विवाहेच्छुक मुलगा, त्याचा भाऊ व वडील अशा चौघाविरुद्ध पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

नवरदेव, त्याचा भाऊ यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिरापूर येथे एक उसतोडणी कामगार राहतो. त्याला दोन मुली व एक मुलगा आहे. मोठी मुलगी तिच्या आईच्या माहेरी खुंटेफळ (ता.शेवगाव ) येथे मामाकडे राहत होती. ती सहावीला आहे. सहा जून 2020 रोजी दिलीप खंडागळे, रामा खंडागळे ( नवरदेव) , गौतम खंडागळे (रा. हासनापूर, कोळगाव) हे शिरापूर येथे आले.

मुलीचा साखरपुडा करुन विवाह करावयाचा आहे, संबंधित मुलीच्या वडिलांनी सांगितले. याला मुलीच्या आईने विरोध केला. त्यानंतर मुलीला घेवुन वरील चौघेजण तिसगाव येथे गेले. तेथून मुलीला व मुलाला नवीन कपडे आणले. सायंकाळी साडेपाच वाजता मुलीला घेवुन हे चौघेजण गेले. त्यांनी साखरपुडा करुन विवाहाची तयारी केली.

मुलगी घेवुन गेल्याने आईने ही हकीगत तिच्या माहेरी भाऊ व वडीलांनी सांगितली. मुलीचा चुलता यानेही या विवाहाला विरोध केला. मात्र, माझी मुलगी आहे, मी काहीही करीन व विवाह लावून देईल असे सांगितले. तुम्ही कोणी मध्ये येऊ नका, असे सांगितले.

मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुलीचा बाप, नवरदेव ,त्याचा भाऊ व नवरदेवाचा बाप अशा चार जणांविरु्दध बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 1929 चे कलम नऊ, अकरा नुसार, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51(ब) , कोवीड 2020 चे कलम 11, साथरोग 1897 कलम 2,3,4 नुसार यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. नवरदेव (रामा) व त्याचा भाऊ (गौतम) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीच्या बापाला दारूचे व्यसन आहे. यामुळे त्याने असे कृत्य केले असल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्ह्टले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

SCROLL FOR NEXT