SUICIDE esakal
अहिल्यानगर

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरूणाची रेल्वे समोर येवून आत्महत्या

सकाळ वृत्त सेवा

श्रीरामपूर, (जि. अहमदनगर) : दौंड- मनमाड रेल्वे मार्गावरील अशोकनगर परिसरात २५ वर्षीय एका तरुणाने रेल्वेसमोर येवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. सदर तरुण तालुक्यातील उक्कलगाव येथील रहीवाशी असून शिक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून तो येथील कांदा मार्केट परिसरात राहत होता.

अक्षय अनिल पावसे असे त्याचे नाव असून मेडिकलच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. बुधवारी अशोकनगर परिसरात एका एक्सप्रेस रेल्वेगाडीच्या इंजीनसमोर येवून त्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. प्रारंभी तरुणाची ओळख पटत नव्हती.

मृतदेहाच्या उत्तरणीय तपासणीसाठी येथील कामगार रुग्णालय आणले. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटली. सदर तरुण तालुक्यातील उक्कलगाव येथील रहीवाशी असून गेल्या काही दिवसापासून तो कांदा मार्केट परिसरात राहत असल्याचे पोलीसांनी सांगितले.

त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा मोठा परिवार आहे. अद्याप आत्महत्या केल्याचे कारण समजलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT