Meenal Khambekar as the General Secretary of the Congress 
अहिल्यानगर

काँग्रेसच्या सरचिटणीसपदी मीनल खांबेकर

मनोज जोशी

कोपरगाव ः कॉंग्रेसच्या जिल्हा सरचिटणीसपदी येथील माजी नगराध्यक्षा मीनल अशोक खांबेकर यांची निवड झाली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी त्यांची निवड केली.

कॉंग्रेसची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून, तीत 10 सरचिटणीस असून, खांबेकर या एकमेव महिला सरचिटणीस आहेत. 2014 ते 2016 या काळात त्यांनी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा म्हणूनही काम केले आहे.

जिल्हा नियोजन समिती सदस्या, कोपरगाव पालिकेत नगरसेविका, पाच वर्षे उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष तसेच कोपरगाव शहर विकास आघाडीच्या गटनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

संघटनात्मक व प्रशासकीय कामाचा अनुभव असल्याने त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले. खांबेकर यांच्या निवडीचे कॉंग्रेसच्या कोपरगाव शहर, तालुका, युवक कॉंग्रेस, महिला कॉंग्रेस, विद्यार्थी कॉंग्रेस, सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Compensation Rule: महाराष्ट्रात अतिवृष्टी मदतीत मोठा बदल! सर्व पशुपालकांना नुकसान भरपाई मिळणार; ‘मर्यादा’ पूर्णपणे रद्द

"न रडता तिने स्वतःसाठी नवा मार्ग शोधला" सिद्धार्थने केलं बायकोचं कौतुक; बायकोच्या नव्या करिअरविषयी म्हणाला..

Pimpri News: पाणीगळतीने ‘ग्रेडसेपरेटर’ धोकादायक; सात वर्षांपासून कारण सापडेना; तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा महापालिकेवर आरोप

Latest Marathi News Live Update : खरातशी निकट संबंध असलेल्या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी – अनिल देशमुख

Pune News: पिंपळवंडीत अघोरी पूजेचा प्रकार?; स्मशानभूमीत जळत्या चितेवर टाकले मृत कोंबडे, जुन्नर तालुक्यातील धक्कादायक प्रकार!

SCROLL FOR NEXT