Pani 
अहिल्यानगर

मिरी-तिसगाव योजनेची उद्या बैठक, ३२ गावच्या सरपंचांना आमंत्रण

राजेंद्र सावंत

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील २८ व नगर तालुक्यातील ४ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेची आढाव बैठक उद्या (शनिवारी) पाथर्डी पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी ३२ गावच्या सरपंचांना आमंत्रित केले असल्याची माहिती या योजनेचे सचिव भाउसाहेब सावंत यांनी दिली.

तिसगावच्या पाणी प्रश्नावर मंत्री प्राजक्त तनपुरेंनी लक्ष घालावे या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून दैनिक सकाळने लक्ष वेधले होते. गेल्या दीड वर्षापासून पाणीप्रश्नाबाबत काहीच केले गेले नाही. त्यामुळे तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे यांनी ना. तनपुरे यांना पाणीप्रश्नाबाबत लक्ष घालावे असे दै.सकाळशी बोलताना सांगितले. या वृत्तानंतर ना.तनपुरे यांनी ही बैठक बोलावली आहे. (Meeting tomorrow on Miri-Tisgaon water project)

तिसगावच्या पाणी प्रश्नाबाबत काय योजना आहे. या बाबत ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच लाभार्थी गावाकडे असलेली थकबाकी व पाणी योजनेचा खंडीत वीज पुरवठा आदीविषय या बैठकीत होण्याची शक्यता असल्याने परिसरातील गावांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.

अध्यक्ष बदलण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीतील सत्तांतरानंतर नवे गडी नवा डाव या प्रमाणे मिरी-तिसगाव योजनेचे अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, शिवसेनेच्या काही तनपुरे समर्थक नेत्यांनी अध्यक्ष बदलास स्थगिती दिली होती. परंतु आता जिल्हा परिषद व पंचायत समीती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनीच आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच मजबूत पक्ष बांधणी करण्यासाठी कार्यकत्यांची विविध पदावर नियुक्त करणे महत्वाचे असल्याने त्या दृष्टीकोणातून नेत्यांनीही आता कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही बैठक घेतली आहे. या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली झाल्या आहेत. अनेक ग्रामपंचायतींकडून तशा प्रकारचे ठराव आले असल्याचे माहिती कार्यकर्त्यानी दिली.(Meeting tomorrow on Miri-Tisgaon water project)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT