Amit Shaha and Radhakrishna Vikhe Patil sakal
अहिल्यानगर

Radhakrishna Vikhe Patil : दूधप्रश्‍नाबाबत केंद्र सरकार सकारात्‍मक; अमित शहा यांचे वेधले लक्ष

मंत्री विखे पाटील यांनी आजपर्यंत महायुती सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती मंत्री अमित शहा यांना दिली.

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी - ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे दूध उत्पादकांच्या दुधाला हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी राज्याचे दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिली. मंत्री विखे आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी शहा यांची दिल्लीत भेट घेऊन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.

यावेळी मंत्री विखे पाटील यांनी आजपर्यंत महायुती सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती मंत्री अमित शहा यांना दिली. दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. दूध उत्पादन व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. दुधाला हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय केल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

राज्य सरकारने सद्य परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता दोन दिवसांपूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे, तसेच सहकारी व खासगी दूध संघाच्या प्रतिनिधीची बैठक घेऊन दुधाला ३० रुपये स्थायीभाव व ५ रुपये शासकीय अनुदान असा ३५ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी तीन महिन्यांकरिता अनुदान दिले असल्याचे विखे यांनी आवर्जून सांगितले.

राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा

दूध दरामध्ये होणारी चढ, उतार लक्षात घेऊन हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारने विचार करण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेली विनंती मान्य करून दुधाच्या हमी भावाबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास केंद्र सरकार निश्चित याबाबत सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT