

Raj Thackeray Targets BJP Over Chhath Puja
ESakal
मुंबई : मुंबईत हायकोर्टाने समु्द्र किनारी छठपूजा साजरी करण्यास मनाई आदेश जारी केल्यानंतर काही राजकीय नेत्यांकडून या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. तसेच मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर छठपूजेनिमित्त भोजपुरी गाणी देखील लावल्यामुळे नवा वाद उफाळून आला आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छठपूजा आणि मराठी-परप्रांतीय वादावर रोखठोक भूमिका मांडली आहे. ज्यामध्ये भाजपकडून राज्यात छठ पूजा हा मुद्दा वापरून संघर्ष निर्माण केला जात असल्याचे म्हटले आहे.