MLA Jagtap lodged a complaint with the Guardian Minister 
अहिल्यानगर

आमदार जगताप यांनी आयुक्तांची केली पालकमंत्र्यांकडे तक्रार

अमित आवारी

नगर ः जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना व अन्य विषयांवर आढावा बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री मुश्रीफ बोलत असतानाच, आमदार संग्राम जगताप यांची "एन्ट्री' झाली. त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व महापालिका आयुक्‍तांच्या कामाबाबत त्यांच्या हजेरीतच पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे तक्रारी केल्या. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली. 

जगताप म्हणाले, ""लॉकडाउनमधून शिथिलता दिल्यापासून शहर परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. केडगाव परिसरात चोऱ्यांचे प्रकार वाढल्याने नागरिक समूहाने जागे राहून रात्रीचा पहारा देत आहेत. ही स्थिती शहराची असेल, तर ग्रामीण भागाची काय अवस्था असेल? केडगाव येथे दिवसा घरात दरोडेखोर घुसण्याचा प्रयत्न करतात.

या बाबत तक्रार देण्यासाठी नागरिक गेले असता, कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवून घेतली जात नाही. उलट, फिर्याद देऊ नका, असे पोलिस म्हणतात. 

शहरात वाहतुकीचाही प्रश्‍न गंभीर आहे. असे प्रश्‍न विधानसभेत कसे मांडायचे? कोठला बसस्थानकाजवळ महामार्गावर वाहने पार्किंग केली जातात. शहरातील मोकाट जनावरांवर कारवाई करा, असे महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांना गेल्या चार महिन्यांपासून सांगत आहे. मात्र, त्यांच्या पथकाने एकही जनावर पकडलेले नाही.

ही मोकाट जनावरे महामार्गावर बसतात. त्यातून वाहतूककोंडी, अपघातांचे प्रकार होत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता तीन वर्षांपूर्वी मंजूर झाला होता. अजूनही त्याचे काम झालेले नाही. निधी असूनही कामे होत नाहीत.

या संदर्भात चार महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी सायंकाळी सहानंतर नागरिकांना स्वतःचे संरक्षण करावे लागत असेल, तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नसल्याचे जगताप म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

SCROLL FOR NEXT