mla radhakrishna vikhe patil said sangamner is known for its contractor culture
mla radhakrishna vikhe patil said sangamner is known for its contractor culture  Sakal
अहमदनगर

ठेकेदार संस्कृतीच संगमनेरची ओळख - राधाकृष्ण विखे पाटील

आनंद गायकवाड

संगमनेर (जि. अहमगनगर) : तालुका ठेकेदार चालवतात, आगामी नगरपरिषद निवडणूकीत सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा, भ्रष्टाचार, ठेकेदार संस्कृती जनतेसमोर मांडून वास्तव समजावून सांगा. ही संस्कृती मोडीत काढण्याची मुहूर्तमेढ नगरपरिषद निवडणूकीच्या निमित्ताने रोवण्याचे आवाहन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.


संगमनेरात भाजप कार्यकर्त्यांच्या वज्रनिर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा नामोल्लेख टाळून टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, की ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते मुंबईत जाऊन बसले. टीका होऊ लागल्यावर अधिकाऱ्यांसमवेत बागेत फोटो काढून आढावा घेतल्याचे जाहीर केले. सर्वांत जास्त खासगी कोविड सेंटरच्या माध्यमातून संगमनेरात रुग्णांची सुमारे २०० ते २५० कोटी रुपयांची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला. घुलेवाडीचे कोविड सेंटर इच्छामरण हवे असणाऱ्यांसाठी होते. रुग्ण खासगी व्यवस्थेच्या भरवशावर सोडले होते. खासगी व शासकीय कोविड सेंटरमध्ये बरे झालेले रुग्ण व मृत्यूबाबत लोकप्रतिनिधींनी श्वेतपत्रिका काढावी. मराठा व ओबीसी विद्यार्थ्यांना प्रवरेने ५० टक्के शुल्क माफ केले, मग संगमनेरने का नाही केले, असा सवाल विखे यांनी उपस्थित केला. आपले हॉस्पिटल विकले गेल्यानंतर ३० वर्षांनंतर उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाल्याचा टोला त्यांनी लगावला.


बूथ कार्यकर्त्यांनी आगे बढो, झिंदाबादच्या घोषणा देण्याऐवजी मैदानात उतरून नगरपरिषदेत भाजपची सत्ता आणण्याच्या निर्धाराने सूक्ष्म नियोजन करावे. अंधारात उद्योग करणारे उघडे पडणार असून, तडजोडी करणाऱ्यांना संधी मिळणार नाही. भाजपची कामे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोचविण्याची गरज असल्याचे सांगत कानपिचक्या दिल्या.
जालिंदर वाकचौरे, डॉ. अशोक इथापे, ॲड. श्रीराम गणपुले, सतीश कानवडे, योगिराज परदेशी, जावेद जहागीरदार, शिरीष मुळे, मेघा भगत, विक्रम खताळ, रोहीत चौधरी, वसंतराव देशमुख, वसंतराव गुंजाळ आदींसह भाजपचे विविध पदाधिकारी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

विखे उवाच…

केंद्राची लस नगरसेवकांनी देणे म्हणजे दुसऱ्याची कढी.. धावू धावू वाढी, अशी अवस्था आहे,
पंतप्रधान पीकविमा : संगमनेर तालुक्यातील ३१ हजार ८८६ शेतकऱ्यांना २३ कोटी ५६ लाख रुपयांचे वाटप, किसान सन्मान योजना : ५ लाख २४ हजार ३४७ शेतकऱ्यांना १०४ कोटी रुपये वाटले. आजवर पंतप्रधान निधीतून तालुक्याला १५८ कोटी २७ लाख ५४ हजार रुपये प्राप्त झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT