MNS agitation for electricity bill in Kopargaon
MNS agitation for electricity bill in Kopargaon 
अहमदनगर

मनसेचे कोपरगावात वीज बिलासाठी खळ्ळ, खट्याक

मनोज जोशी

कोपरगाव ः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्याचे बिल माफ करावे या मागणीसाठी जन आक्रोश आंदोलनात आज मनसेच्या उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल यांच्यासह चार पदाधिकाऱ्यांनी खळ्ळ.... खट्याक.... करीत महावितरण कार्यालयाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता दालन व खुच्यांची तोडफोड करीत शासनाचे लक्ष वेधले.

पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी गंगवाल, तालुकाप्रमुख अनिल गायकवाड, मार्गदर्शक सुनील फंड ,योगेश गंगवाल यांच्यासह आणखी एकाला ताब्यात घेतले.

महावितरण कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा आणून हातात दंडुके घेत अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्या दालनाची तसेच खुर्च्यांची तोडफोड केली. दुपारी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

या वेळी संतोष गंगवाल म्हणाले, लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करावी म्हणून या सरकारला अनेक वेळा निवेदन दिले.

"एक ईमेल ऊर्जा मंत्र्यांना"या आंदोलनातून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना तालुक्यातून तब्बल पाच हजार इमेल करून शासनाचे लक्ष वेधले. मात्र, त्याचा कुठलाही फरक या शासनावर जाणवत नाही. लॉकडाऊन तीन महिन्यांचे बिल या शासनाने तातडीने माफ करावे, अशी मागणीही गंगवाल यांनी यावेळी केली.

दरम्यान मनसेच्या वतीने आणखी एक आंदोलन करून निवेदन देण्यात आले. त्यात मनसेचे शहराध्यक्ष सतीश काकडे, आलिम शहा, विजय सुपेकर, अनिल गाडे, रघुनाथ मोहिते, संजय चव्हाण आदी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

या वेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चावडा यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की लॉक डाऊन च्या काळात महावितरणने ग्राहकांना वाढीव दराने रिडींग न घेता अइव्वाच्या सव्वा बिले दिले. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले. त्यातच राज्याचे ऊर्जामंत्री यांनी वीज बिलात सूट देणार असल्याची घोषणा केली. मात्र, ती फसवी निघाली.

अखेर ऊर्जामंत्र्यांनी घुमजाव करीत कुठल्याही प्रकारची वीजबिल माफी मिळणार नसल्याचे जाहीर करून जनतेची घोर फसवणूक केली आहे. त्याचा मनसेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. वाढीव वीज बिल माफ करून या शासनाने सर्व सामान्य जनतेला दिलासा द्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन मनसेच्या वतीने छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

संपादन - अशोक निंबाळकर


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT