Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

दिग्गज अभिनेते बर्नार्ड हिल यांचं काल ५ मे २०२४ ला निधन झालं. जाणून घेऊया त्यांच्या काही गाजलेल्या भूमिकांविषयी.
Bernard Hill Superhit Roles
Bernard Hill Superhit Roles

Bernard Hill : टायटॅनिक सिनेमातील कॅप्टन या भूमिकेमुळे सगळ्यांच्या लक्षात राहिलेले ज्येष्ठ अभिनेते बर्नार्ड हिल यांचं ५ मे २०२४ ला वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झालं. उत्तम अभिनेते म्हणून त्यांची जगभरात ओळख होती. त्यांचे सिनेमे आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही लोकप्रिय आहेत. जाणून घेऊया त्यांच्या काही लोकप्रिय भूमिकांविषयी.

बर्नार्ड (Bernard Hill) यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सिनेमांमध्ये टीव्ही शोजमध्ये काम केलं. त्यांच्या कामासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले. पण त्यांची सगळ्यात जास्त गाजलेली भूमिका म्हणजे लॉर्ड ऑफ रिंग्ज (Lord Of Rings) या सिनेमातील थियोडन ही व्यक्तिरेखा. रोहान राज्याचा राजा त्यांनी या सिनेमात साकारला होता जो अतिशय कमजोर असून तो पूर्ण त्याच्या सल्लागाराच्या अधीन गेला आहे असं या सिनेमात दाखवण्यात आलं होतं. त्यांनी साकारलेली ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तया सीरिजमधील 'द रिटर्न ऑफ किंग' या सिनेमाला तब्बल ११ ऑस्कर्स मिळाले होते. या सिनेमातील त्यांचा लूक आणि अभिनय याचे आजही लोक फॅन आहेत.

Bernard Hill Superhit Roles
'Lord Of The Rings' च्या कलाकारांना 'मुंबईच्या डबेवाल्यांची' भुरळ!

तर लोकप्रिय 'टायटॅनिक' या सिनेमात त्यांनी जहाजाचा कॅप्टन एडवर्ड स्मिथ ही भूमिका साकारली होती. टायटॅनिक सिनेमात दाखवण्यात आलेल्या काही मोजक्या खऱ्या पात्रांपैकी ही एक भूमिका होती. या सिनेमालाही ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. त्यांनी साकारलेला कॅप्टन एडवर्ड सगळ्यांनाच आवडला होता. बोट आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्राण पणाला लावणार एडवर्ड स्मिथ सगळ्यांनाच आवडला.

याशिवाय रिचर्ड अॅटनबर्ग दिग्दर्शित गांधी या सिनेमातही त्यांनी काम केलं होतं. या सिनेमात त्यांनी सार्जंट पुतनाम या इंग्लिश अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. या सिनेमात रोहिणी हट्टंगडी आणि बेन किंग्जले यांची मुख्य भूमिका होती. बर्नार्ड यांनी छोट्याशा पण लक्षवेधी भूमिकेने सगळ्यांचं मन जिंकून घेतलं.

तर १९८२ मध्ये रिलीज झालेल्या बॉईज फ्रॉम ब्लॅकस्टफ मध्ये त्यांनी साकारलेली यॉसर ही व्यक्तिरेखा सुपरहिट झाली. आपली मुलं आपल्यापासून दुरावू नये म्हणून धडपडणारा यॉसर त्यांनी या सिरीजमध्ये साकारलेला होता. त्यांची ही भूमिका त्यांनी साकारलेल्या आतापर्यंत सगळ्या भूमिकांपैकी सर्वोत्कृष्ट भूमिका असल्याचं त्यांचे चाहते मानतात.

बर्नाड यांना अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यामध्ये त्यांना बाफ्टा अवॉर्ड, क्रिएटिव्ह चॉईस अवॉर्ड, ब्रॉडकास्टिंग प्रेस गिल्ड अवॉर्ड आणि इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्साठी नामांकन मिळाले होतं. त्यांच्या निधनामुळे जगभरातील चाहते हळहळले आहेत.

Bernard Hill Superhit Roles
Titanic: 'टायटॅनिक'मधील 'त्या' आयकॉनिक दरवाज्याचा लिलाव; रोजच्या ड्रेसचीही लागली बोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com