Money is taken for Sidarshan pass in Shirdi 
अहिल्यानगर

शिर्डीत साईदर्शन पासचा होतोय काळाबाजार, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यालाही आला अनुभव

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः ज्या साईबाबांनी लोकांसाठी आपला देह झिजवला, त्या बाबांच्या केवळ दर्शनासाठीही पैशांचा काळाबाजार केला जात आहे. सर्वसामान्य भक्तांना तर कायम पिडले जाते. राजकीय नेत्यांनाही हा अनुभव आला.

साईदर्शनाचा सशुल्क पास मिळविण्यासाठी रांग आणि पुन्हा दर्शनासाठी रांग, या त्रासातून भाविकांची सुटका करण्यासाठी नवी यंत्रणा कार्यरत झाली.

दुप्पट दर आकारून हे पास भाविकांना विकण्याची सेवा सुरू झाली. त्याचा अनुभव नगर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब जगताप यांचे चिरंजीव युवराज जगताप यांना आज आला. त्यामुळे दर्शनपासचा काळाबाजार पुन्हा चव्हाट्यावर आला. 

जगताप आज घरच्या मंडळींसह साईदर्शनासाठी आले होते. सशुल्क दर्शनपाससाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तासभर रांगेत उभे राहूनही पास मिळण्याची शाश्वती नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी येथील स्थानिक मित्रांना फोन करून साईदर्शनासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. मात्र, सर्वांनी असमर्थता व्यक्त केली.

पूर्वी येथील विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी हे बाहेरून येणाऱ्या नेते-पदाधिकाऱ्यांची दर्शनाची व्यवस्था करीत. त्याकरिता स्थानिकांना सशुल्क पास घेण्याची वेळ आली, तरी तो विनाविलंब मिळत असे.

आता स्थानिकांचीच दर्शनाची पंचाईत झाली आहे. अनावधाने साईमंदिरात जावे, तर न जाणो कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशीही भीती. 

कुणाचेच सहकार्य मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर जगताप यांनी साईमंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन नगरला माघारी जाण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात दोघे त्यांच्याकडे आले. प्रत्येकी 400 रुपये दिल्यास, सर्वांना दर्शनपास देण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला.

जगताप यांनी हे सशुल्क दर्शनपास खरे असल्याची खात्री करून घेतली. त्यांच्या हातावर दोन हजार रुपये ठेवले व साईदर्शनासाठी दर्शनबारीत रांग लावली. 

साईदर्शनानंतर त्यांनी ही हकीगत वडिलांना फोनवर सांगितली. त्यांनी साईसंस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनद्वारे वारंवार संपर्क साधला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर त्यांनी हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते धनंजय शेळके यांच्या कानावर घातला. 

साईमंदिरात दर्शनपासचा खुलेआम काळाबाजार सुरू आहे. आपण ही बाब नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कानावर घातली. येत्या मंगळवारी आम्ही याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार आहोत. 
- बाळासाहेब जगताप, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: बीएमसी रणांगणात महायुतीचा मास्टरप्लॅन! भाजप आणि शिंदेसेनेचा फॉर्म्युला जवळपास निश्चित; कोण किती जागा लढवणार?

Yogi Adityanath : औरंगजेबाची मोठी घोडचूक काय होती? वीर बाल दिवसानिमित्त योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल!

शेतकरी कर्जमाफीसाठी बॅंकांची माहिती तयार! ३० जून ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदारांचा समावेश; नियमित कर्जदारांना मिळणार ‘हा’ लाभ

आजचे राशिभविष्य - 28 डिसेंबर 2025

Panchang 28 December 2025: आजच्या दिवशी मंजिष्ठ, केशर किंवा रक्तचंदन पाण्यात टाकून स्नान करावे

SCROLL FOR NEXT