Most of the machinery of Parner taluka milk team has been stolen 
अहिल्यानगर

पारनेर तालुका दूध संघातील 51 लाखांची चोरी झाकण्यासाठी संघाच्या माजी अध्यक्षांची न्यायालयात धाव : दादासाहेब पठारे

मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) :  पारनेर तालुका दूध संघाचे संकलन 2010 सालापासून बंद करण्यात आले आहे. तसेच बंद असलेल्या सुपे व नारायणगव्हाण येथील दूध  शीतकरण केंद्राची सुमारे सव्वा कोटी रूपयांची यंत्र सामुग्री जिल्हा दूध संघाने तालुका दूध संघाकडे वर्ग केली होती. यातील बुहुतेक सारी यंत्रसामुग्री चोरीस गेली आहे. शीतकरण यंत्राचा फक्त सांगाडा शिल्लक आहे. शीतकरणकेंद्रातील सुमारे 51 लाख रूपयांची यंत्रसामुग्री चोरीस गेल्याचे निदर्शनास आले आहे. ही चोरी झाकण्यासाठी तत्कालीन अध्यक्षांनी न्यायालयात धाव घेतली असल्याचा आरोप प्रशासकिय अध्यक्ष दादासाहेब पठारे यांनी केला आहे.

तालुका दूध संघाचे संकलन सुमारे गेली दहा वर्षापासून बंद आहे. जिल्हा संघाचे विभाजण झाले. त्यावेळी जिल्हा संघाने पारनेर तालुका दूध संघाला सुपे व नारायणगव्हाण येथील जागेसह शीतकरण यंत्रसामुग्री वर्ग केली होती. मात्र तालुका दूध संघ गेली 10 वर्षापासून बंदच आहे. त्यामुळे सुपे येथील शीतकरण केंद्रातील सुमारे सव्वा कोटी रूपयांची यंत्रसामुग्री त्यावेळी तालुका संघाकडे वर्ग झाली होती. मात्र संघ दहा वर्षापासून बंद असल्याने यातील बहुतेक सारी यंत्रे चोरीस गेली आहेत. अता या यंत्राचा फक्त सांगाडा शिल्लक आहे. ही चोरी झाकण्यासाठी माजी अध्यक्षांनी न्यायालयात धाव घेतली असल्याचा आरोपही पठारे व प्रशासकिय संचालक संभाजी रोहकले यांनी केला आहे.

पठारे म्हणाले, तालुका दूध संघाच्या सुपे येथील दूध शीतकरण केंद्राची पाहणी केली असता सुमारे 51 लाख रूपयांच्या साहित्याची चोरी झाली असल्याचे दिसून आले आहे. गेल्या महिन्यात 13 नोव्हेंबरला प्रशासकीय मंडळाच्या बैठकीमध्ये गेली 10 वर्षापासून आजतागायत ज्यांच्या ताब्यात तालुका दूध संघ होता त्यांनी लक्ष न दिल्यानेच या य़ंत्रसामुग्रीची चोरी झाली आहे. व त्यातून तालुक्याची कामधेनू असलेल्या दूध संघाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचा ठराव करण्यात आला आहे. 

दूध संघ सुरू करण्यासाठी आमदार निलेश लंके यांनी प्रयत्न करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. तसेच दूधाला चांगला भाव मिळाला पाहिजे या साठी नोव्हेंबर महिन्यातच दूध संस्थांच्या ठेवीचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून 20 दूध उत्पादक शेतकऱ्यांना बल्ककुलरचे वाटपही करण्यात येणार आहे. येत्या 10 डिसेंबर रोजी सफलता मंगल कार्यालयात सभासदांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. या बैठकीस दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष पठारे, प्रशासकिय सदस्य संभाजी लोहकरे व सुरेश थोरात यांनी केले आहे.

संघाची सुमारे 51 लाखाची यंत्र सामुग्री चोरीस गेली. वास्तविक तिच्या रक्षणाची जबाबदारी माजी अध्य़क्ष व संचालकांची होती. त्यांनी या काळात संघाच्या व्यवस्थापक व वॉचमन यांच्या पगारावर 15 लाख रूपये खर्च केले आहेत. तरीसुद्धा यंत्रसामुग्री चोरीस गेली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Minister Resignations: मेघालयमध्ये राजकीय हालचालींना वेग; 12 पैकी आठ मंत्र्यांचे राजीनामे; जाणून घ्या, नेमकं कारण?

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Latest Marathi News Updates : आयुष कोमकर हत्या प्रकरण : कृष्णा आंदेकर २ दिवस पोलीस कोठडीत

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

SCROLL FOR NEXT