टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड शनिवारी होणार आहे.पण शुभमन गिलच्या दुखापतीमुळे संघाची चिंता वाढली आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचव्या टी२० सामन्यात खेळला नाही..टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा पुढच्यावर्षी भारत आणि श्रीलंका देशात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी शनिवारी (२० डिसेंबर) भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. पण त्यापूर्वीच भारतीय संघाची चिंता वाढली आहे. सध्या शुक्रवारी (१९ डिसेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना होत आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यातून उपकर्णधार शुभमन गिल बाहेर झाला आहे. त्याच्याबाबतीत बीसीसीआयने अपडेट दिले आहेत..IND vs SA, 5th T20I: हार्दिक पांड्या पेटला, अभिषेक शर्माचा विक्रम मोडला; तिलक वर्माच्या साथीने भारताला गाठून दिला २३० धावांचा टप्पा.शुभमन गिल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी२० सामन्याला मुकला आहे. त्याला लखनौमध्ये १६ डिसेंबर रोजी चौथ्या टी२० सामन्यापूर्वी सराव करताना पायाला छोटी दुखापत झाली आहे. त्यामुळे पाचव्या टी२०सामन्यात गिलच्या जागेवर संजू सॅमसनचे भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले. सॅमसनने सलामीला खेळताना २२ चेंडूत ३७ धावांची खेळी करत छाप पाडली आहे. अशात आता शनिवारी भारतीय संघाची निवड होण्यापूर्वी संजू सॅमसनने त्याच्याकडे सलामीच्या जागेसाठी लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता निवड समिती शुभमन गिल आणि संजू सॅमसनबाबत शनिवारी काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल..IND vs SA, 5th T20I: संजू सॅमसनचे पुनरागमन, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल; द. आफ्रिकेने जिंकला टॉस.तथापि, गिलच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने माहिती देताना सांगितले की '१६ डिसेंबरला लखनौमध्ये नेट्समध्ये फलंदाजी करताना शुभमन गिलच्या उजव्या पायाला दुखापत झाली. वैद्यकिय तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला असून त्याच्यावर बीसीसीआयची मेडिकल टीम उपचार करत आहे. तो तंदुरुस्तीच्या मार्गावर आहे, पण सध्या अहमदाबादमध्ये होत असलेल्या पाचव्या टी२० सामन्यासाठी उपलब्ध नाही.'.शुभमन गिल सध्या फारशा चांगल्या फॉर्ममध्ये नाही. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या तिन्ही सामन्यात मोठी खेळी करता आली नव्हती. तो पहिल्या सामन्यात ४ धावांवर बाद झालेला, तर दुसर्या सामन्यात शून्यावर बाद झालेला. तिसऱ्या सामन्यात त्याने २८ धावा केल्या होत्या. त्याची टी२० मधील कामगिरी गेल्या अनेक सामन्यांमध्ये फारशी चांगली झालेली नाही. त्यामुळे अनेकांनी त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता त्याच्याबाबत निवड समिती काय निर्णय घेणार हे शनिवारी समजणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.