mula dam water level sakal
अहिल्यानगर

Mula Dam water Level : मुळा धरणाच्या पाणलोटात पावसाची हजेरी; धरणसाठा ४५ टक्क्यांवर

गुरुवारी मुळा धरणाच्या पाण्याची आवक वाढली

सकाळ डिजिटल टीम

राहुरी - मुळा धरणाच्या पाणलोटात हरिश्चंद्रगडावर काल (बुधवारी) पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आज (गुरुवारी) धरणात पाण्याची आवक वाढली. लहीत खुर्द (कोतूळ) येथे मुळा नदीतून ५ हजार क्यूसेकने आवक सुरू झाली.‌ सायंकाळपर्यंत धरणसाठा ११,७०० (४५ टक्के) दशलक्ष घनफूट झाला.

मुळा धरणाच्या पाणलोट व लाभक्षेत्रात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे. मुळा नदीतून १० हजार क्यूसेकपेक्षा जास्त पाणी वाहण्यास सुरवात झाल्यावर खऱ्या अर्थाने धरणसाठा झपाट्याने वाढण्यास सुरवात होईल.

धरणाच्या पाणलोटात नदीपात्रातील पाणी मोजण्याचे ठिकाण असलेले लहीत खुर्द ते मुळा धरणादरम्यान नव्वद किलोमीटरचा नदीपात्रातील प्रवास करून पाणी धरणात पोचते. राहुरी, नेवासे, शेवगाव व पाथर्डी तालुक्यांतील तीस ते चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन होत असल्याने, शेतकऱ्यांच्या नजरा धरणाच्या पाणीपातळीकडे वेधल्या आहेत. येत्या चार-पाच दिवसांत धरणाच्या पाणलोटात संततधार सुरू राहिली तर, धरण वेगाने पन्नास टक्के भरण्याची चिन्हे आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT