crime esakal
अहिल्यानगर

धाकट्या भावाकडून थोरल्याच्या खून

राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे

सकाळ वृत्तसेवा

राहुरी - पिंपळगाव फुणगी येथे लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून जीवे ठार मारले. मोठा भाऊ दारूच्या नशेत घरातील लोकांना शिवीगाळ व मारहाण करीत असल्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून, लहान भावाने कुऱ्हाडीचा घाव घातल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपी लहान भावाला अटक केली. त्याच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अमोल अरुण लोखंडे (रा. पिंपळगाव फुणगी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राहुल अरुण लोखंडे (वय २६, रा. बनसोडे वस्ती, पिंपळगाव फुणगी) असे मृताचे नाव आहे. काल (सोमवारी) रात्री साडेआठ वाजता राहुल लोखंडे दारू पिऊन घरी आला. घरातील लोकांना शिवीगाळ करून, मारहाण करू लागला. आरोपी अमोल याने कुऱ्हाडीचा टोला डोक्यात घातला. तो घाव प्राणघातक ठरला. माहिती समजताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीला तात्काळ अटक केली. पिंपळगाव फुणगीचे कामगार पोलीस पाटील संजय वनगे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karul Ghat Landslide : करूळ घाटातून प्रवास करताय? दरड कोसळल्याने तळेरे-कोल्हापूर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा; व्हाळात वाहून गेलेल्या तरुणाबाबतही वाईट बातमी

Mumbai News : मोठा निर्णय! आता जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी नेमकं कोणती कामं करणार? महसूल प्रशासनात ऐतिहासिक बदल!

Latest Marathi Live Update: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने दहा बंधारे पाण्याखाली, नदीपात्रातील पाणी झपाट्याने वाढले

Eknath Shinde: कामाच्या अतिताणाचा फटका! एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; अचानक प्रकृती बिघडल्याने कार्यक्रमही रद्द

E20 Petrol Hardeep Singh Puri : पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळले जाते? खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितल; सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजचा संदर्भ

SCROLL FOR NEXT