Nagar Expiry food given children Complaint Collector police investigation food Quality
Nagar Expiry food given children Complaint Collector police investigation food Quality Sakal
अहमदनगर

Nagar: बालकांना वाटला एक्सपायरी आहार?, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार..

सकाळ डिजिटल टीम

पारनेर - पारनेर शहरातील अंगणवाड्यांमध्ये मुदत संपलेल्या पोषण आहाराचे वाटप केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यात सुधारणा झाली नाही तर थेट आंदोलनाचा इशारा औटी यांनी दिला आहे.

पारनेर शहरात २० अंगणवाड्या आहेत. त्या अंगणवाडीतून सुकडी, उपमा, शिरा या प्रकारच्या पोषण आहाराचे वाटप सहा महिने ते तीन वर्षे बालकांसाठी केले जाते. सद्यस्थितीत वाटलेला पूरक आहार खूप दिवसांपुर्वी तयार केलेला आहे.

त्याच्या वापराचा कालावधी संपलेला आहे. गेल्या आठवड्यात बालकांना दिलेल्या आहाराच्या पॅकिंगवर २० ऑक्टोबर २०२२ अशी तयार झाल्याची तारीख आहे. हा आहार तयार झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत वापरावा, असे बंधन आहे.

या महिन्यात बालकांच्या घरी देण्यात आलेला आहार हा कालावधी समाप्त झाला आहे, असे पालकांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच अंगणवाडीतील सेविकांना घेऊन संबंधित अधिकारी यांना निदर्शनात आणून दिले पण कोणत्याही अधिकाऱ्यांनी फारशी दखल घेतली नाही. ही माहिती औटी यांना समजल्यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. पोषण आहार पुरविण्याचा ठेका प्रेरणा

महिला सहायता बचत गट यांना दिला आहे.

पोषण आहार देणाऱ्या कंपनीने व अधिकाऱ्यांनी बालकांच्या जीवाशी खेळू नये. संबधित कंपनीने सुधारणा केली नाही तर त्यांना काळ्या यादीत टाकावे. त्यांचा आहार बंद करावा. आहार बनवणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी. कारवाई करून योग्य निर्णय घेतला नाही तर संपूर्ण तालुकाभर आंदोलन छेडले जाईल.

-विजय औटी, माजी नगराध्यक्ष, पारनेर

या ठिकाणी आणलेल्या आहार मुलांना कधी वाटला आहे, याबाबत काही सांगता येत नाही, कारण अंगणवाडी सेविका मुलांना आहार वाटप करताना त्यावरील दिनांक पाहूनच वाटतात. आहाराबाबत लाभार्थ्यांचे जबाब घेतले असता.

आम्हाला तयार आहाराऐवजी सुटा सिधा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. हा आहार कधी तयार झालेला आहे? त्यात योग्य प्रमाणात प्रथिने आहेत की नाहीत ? याची तपासणी करण्यासाठी आहाराचे पॅकिंग लॅबला तपासणीसाठी पाठवावे लागतील.

- एन. के. कराळे, महिला बालविकास अधिकारी, शहरी विभाग, नगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Result 2024 : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपची रणनीती

Latest Marathi News Live Update: PM केंद्रीय मंत्री परिषदेतील मंत्र्यांसाठी राष्ट्रपतींकडून आज रात्री ८ वाजता डीनर आयोजन

R Ashwin Returns : IPL 2025पूर्वी धोनीच्या चेन्नईमध्ये परतणार आर अश्विन; फ्रँचायझीने दिली 'ही' मोठी जबाबदारी

Lok Sabha Result: इंडिया आघाडीत असूनही काँग्रेसने शरद पवारांच्या खासदाराला का पाडलं? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

शेअर बाजार कोसळल्यानंतर 'ही' कंपनी झाली मालामाल; निकालाच्या दिवशी 8,000,00,00,000 रुपयांचा निधी जमा

SCROLL FOR NEXT