Nagar Sakal
अहिल्यानगर

Nagar : घरजावई म्हणून राहणे नापसंत; पतीकडून पत्नीसह सासूची हत्या

नगर येथे औद्योगिक वसाहतीत काम करीत होता.

सकाळ वृत्तसेवा

राहुरी - तालुक्यातील कात्रड येथे पतीने मंगळवारी (ता.१५) रात्री अकरा वाजता राहात्या घरात लोखंडी रॉड डोक्यात घालून पत्नी व सासूची हत्या केली. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीचा मृतदेह आज धनगरवाडी (ता. नगर) येथे झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सागर सुरेश साबळे (वय ३०, रा. कात्रड) असे गळफास घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. नूतन सागर साबळे (वय २३) व सुरेखा दिलीप दांगट (वय ४५, दोघीही रा. कात्रड) असे मृत पत्नी व सासूचे नाव आहे. आरोपी सागर घरजावई होता.

नगर येथे औद्योगिक वसाहतीत काम करीत होता. पत्नी माहेरी राहत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद होता. तो रात्री उशिरा घरी आल्यावर वाद विकोपाला गेला. रात्री अकरा वाजता आरोपीने रागाच्या भरात पत्नी व सासूच्या डोक्यात लोखंडी रॉडचे प्रहार केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नी व सासूला सोडून आरोपी त्याच्या दीड वर्षाच्या मुलीला बरोबर घेऊन घराबाहेर पडला. कात्रड येथील भाऊ गणेश साबळे याच्या घरी मुलीला सोडले. एवढ्या रात्री मुलीला घेऊन कशाला आलास, असे भावाने विचारल्यावर मुलगी रडत होती म्हणून तिला आणले, असे सांगून आरोपी फरार झाला.

शंका आल्याने भाऊ, भावजयी यांनी आरोपीच्या सासूचे घर गाठले. त्यामुळे घटना समोर आली. गणेश साबळे यांनी तत्काळ राहुरी पोलिस ठाण्यात माहिती कळविली. पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरिक्षक धनंजय जाधव, सहायक पोलिस निरीक्षक राजू लोखंडे, उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली. दोन मृतदेह नगर येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले. बुधवारी सकाळी मृत सुरेखा दांगट यांचे बंधू भास्कर गंगाधर टेमक (वय ४९, रा. करजगाव, ता. नेवासे) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी सागर विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

दरम्यान, आज (बुधवारी) दुपारी एक वाजता धनगरवाडी (ता. नगर) येथे शिकारे यांच्या शेतातील एका चिंचेच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आरोपी सागर साबळे (वय ३०) याचा मृतदेह पोलिसांना आढळला. याप्रकरणी नगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरजावई म्हणून राहणे नापसंत

घरजावई म्हणून राहणे आरोपी सागर सुरेश साबळे यास पसंत नव्हते. मंगळवारी सासू सुरेखा दांगट यांनी जावयासाठी धोंड्याचे जेवण केले होते. मात्र सततच्या वादामुळे साबळे हा धोंडे जेवणासाठी गेलाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिकीट कापलं जाण्याची भीती, आमदाराचं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन; ट्रेनमध्ये 'अंडरवेअर कांड'मुळे होते चर्चेत

Kolhapur Sister Harassment : बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून तरुणास एडक्याने मारहाण, कोल्हापुरातील धक्कादायक घटना

Ladki Bahin Yojna E-KYC साठी मोठी अपडेट, Aditi Tatkare यांची मोठी घोषणा | Sakal News

अमिताभ यांना उद्धटपणे बोलणाऱ्या इशितप्रमाणे 'या' मुलाने सुद्धा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गमावलेले लाखो, एक करोडचा प्रश्न चुकला

Palghar News:'हजारो आदिवासी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले'; घोषणाबाजीने कार्यालय दुमदूमले, सरकारचे लक्ष वेधणार

SCROLL FOR NEXT