Nagar esakal
अहिल्यानगर

Nagar: अमरापूरच्या रेणुकामाता मंदिरातील दागिने लंपास; सीसीटीव्ही फुटेजमध्ये...

रात्री १२ ते पहाटे ५ या दरम्यान चोरट्यांनी मंदिराच्या प्रवेशव्दाराचे व गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे शुक्रवारी सकाळी पुजारी वैद्य यांच्या निदर्शनास आले.

सकाळ डिजिटल टीम

शेवगाव/ अमरापूर - येथील रेणुकामाता मंदिरात धाडसी चोरी करुन देवीच्या मुर्तीवरील व मंदिरातील सोन्या चांदीचे अलंकार लंपास केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. शुक्रवारी (ता.१८) ही घटना पुजाऱ्यांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी तुषार विजय वैद्य यांच्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्री १२ ते पहाटे ५ या दरम्यान चोरट्यांनी मंदिराच्या प्रवेशव्दाराचे व गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे शुक्रवारी सकाळी पुजारी वैद्य यांच्या निदर्शनास आले. त्यामध्ये देवीच्या मुर्तीवरील छत्री, टोप, दोन समई, मासोळ्या,

श्रीयंत्र, तांब्या फुलपात्र, पंचारती, सिंहासन, दंड असे २१ किलो ६५० ग्रॅम वजनाच्या, १६ लाख २४ हजार २०० रुपये किमतीच्या चांदीच्या तर देवीची नथ, मंगळसूत्र या ८.७ ग्रॅम वजनाचे ५२ हजार २२ रुपये किंमतीचे सोने असा एकूण १६ लाख ७६ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला.

देवस्थानचे प्रमुख व रेणुकामाता पतसंस्थेचे चेअरमन डॉ. प्रशांत भालेराव यांनी तातडीने मंदिर गाठले. त्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, पर्यविक्षाविधीन सहाय्य पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप आहेर, यांच्यासह पोलीस पथक, ठसे तज्ञ व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे चोरी करताना आढळले. तपासासाठी पोलीसांची पथके तयार करण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांनी सांगितले.

चोरीच्या घटनेमुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे. यापुढे देवस्थानच्या वतीने सुरक्षतेबाबत दक्षता घेण्यात येईल. पोलीसांनी सहकार्य करावे.

- डॉ. प्रशांत भालेराव, प्रमुख रेणुकामाता देवस्थान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT