Crime
Crime sakal
अहमदनगर

नगर : रूपाली चाकणकरांना धमकी देणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

नगर: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. नगर तालुका पोलिसांच्या पथकाने चिचोंडी पाटील गावातून भाऊसाहेब रामदास शिंदे (वय ४०) यास ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यास पुणे गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले आहे.

भाऊसाहेब रामदास शिंदे, असे धमकी देणाऱ्याचे नाव आहे. शिंदे याने चाकणकर यांना धमकीचा फोन करून, पुढील ७२ तासांत जिवे मारू, अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. दिल्ली येथे असणाऱ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाइन क्रमांकावर सोमवारी दुपारी ३ वाजून पन्नास मिनिटांनी शिंदे याने फोन केला होता.

रूपाली चाकणकर यांचे नाव घेऊन त्यांना धमकी दिली. त्यानंतर दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयाने मुंबई येथील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क करून ही माहिती दिली.पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT