sakal
sakal
अहमदनगर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळसूबाई गडावरील नवरात्रोत्सव रद्द

सकाळ वृत्तसेवा

अकोले: बारी येथील ग्रामस्थ व कळसूबाई देवस्थान ट्रस्टने यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कळसूबाई गडावरील देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्र उत्सव ७ ऑक्टोबर रोजी असून, विजयादशमी १५ ऑक्टोबरला असून या कालावधीत पर्यटक व भाविकांना गडावर येण्यास बंदी करण्यात आल्याचा निर्णय आज रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष तुकाराम खाडे, भीमराज अवसरकर यांनी दिली आहे.

याबाबत तहसीलदार, अकोले सहायक पोलिस निरीक्ष, राजूर वनविभाग यांना कळविण्यात आले आहे. कळसूबाई शिखरावर दरवर्षी एक लाख भाविक येतात त्यांचे नियोजन करणे प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. सरकारने याबाबत काही निर्बंध लादले असून त्यात देवळात जाता येणार नाही.

प्रत्येक व्यक्तीमध्ये पाच फुटाचे अंतर, मास्क, सॅनिटायझर या गोष्टी तसेच आरोग्य कर्मचारी पोलिस कर्मचारी यांचे अपुरे नियंत्रण त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून राज्यातून व राज्याबाहेरील पर्यटक भाविक यांच्यामुळे अडचण येण्याची शक्यता असून प्रशासनाने याबाबत दोन दिवसात लेखी खुलासा करून ग्रामस्थांना व मंदिर ट्रस्टला कळवावे अशी लेखी मागणी करण्यात आली आहे.

त्यामुळे नवरात्र उत्सव रद्द करण्यात आल्याने पर्यटक व भाविकांना गडावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तुकाराम खाडे, वाळू खाडे, सीताराम खाडे, सचिव वकीलनिवृत्ती चव्हाण, भिमराज अवसरकर, पांडुरंग खाडे, आदींच्या लेखी पत्रावर सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT