Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil sakal
अहमदनगर

शिवसेना संपवण्यासासाठी राष्ट्रवादीचा जन्म

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : राष्ट्रवादीचा जन्मच शिवसेना संपवण्यासासाठी झाला आहे. दोन वर्षात शिवसेना संपल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत वर्तवून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नादी लागू नये. जेवढे लवकर होईल तेवढे बाजूला व्हावे, असा सल्ला खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला.

श्रीरामपूरात आज एका कार्यक्रम प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, एकीकडे सर्वसामान्य शिवसैनिक, खासदार शिवसेनेसाठी रस्त्यावर उतरले होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी कोल्हापुरात संकल्प सभा घेतली. ह्या सभेत शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचा आणि शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही. स्व. बाळासाहेब विखेंपासून शिवसेनेशी आमचे संबंध आहेत. शिवसेनेबद्दल विखे परिवाराला कायमच आदर राहील. राणा, संजय राऊत, किरीट सोमय्या यांच्या पलीकडे राज्यसरकारने बोलावे. दूध, कांदा, शेतकरी, वीज प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी व सरकारने भूमिका घ्यावी.

किसान रेल्वे सुरू करणार

नगर जिल्ह्यात एक लाख हेक्टर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. असे असताना केवळ रेल्वेने वाहतूक होत असल्याने लासलगावला चांगला भाव मिळतो. त्यामुळे श्रीरामपूरला नवीन मालधक्का व किसान रेल्वे सुरू करण्यासाठी व्यापारी व कांदा उत्पादकांची बैठक घेणार आहे. तसेच रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊ हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT