Sharad Pawar  esakal
अहिल्यानगर

NCP Party Celebration : राष्ट्रवादी नगरमध्ये करणार खासदारांच्या विजयाचे सेलिब्रेशन; निकालानंतर पहिलाच मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नगरमध्ये पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे. १० जून रोजी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नगरमध्ये पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे. १० जून रोजी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. पक्ष फुटीनंतर आणि लोकसभा निवडणुकीतील यशानंतर होणाऱ्या या वर्धापन दिनास मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. नवनिर्वाचित खासदार, तसेच राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत.

निकालानंतर हा राज्यातील पहिलाच मेळावा होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली. नगर लोकसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी विजयश्री खेचून आणल्याने महाविकास आघाडीने राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे जयंत वाघ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन असतो, तो वर्धापन दिन यंदा एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथमच वर्धापन दिनाचा कार्यक्रम एकत्रित होत आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, असे फाळके यांनी सांगितले.

डिवचल्याने लोकं चिडले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखे यांनी डिवचले. त्यामुळे मतदार चिडले. महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकारी नेत्यांनी एकमताने काम केले. नीलेश लंके यांचा विजय त्यांच्याच कामाची पावती आहे, असे महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितले.

पवारांना नगरची नेहमीच साथ

नगर जिल्ह्याने नेहमीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ दिली. मागील विधानसभा निवडणुकीत याच जिल्ह्याने बळ दिले. पक्षात फूट पडल्यानंतर नगर जिल्ह्यातच (शिर्डी) पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेथेच लोकसभेचे तुतारी फुंकली होती. आता निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाल्यानंतर नगरमध्ये वर्धापन दिनाचा कार्यक्रम होत असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT