The number of Gram Sevaks is less
The number of Gram Sevaks is less 
अहमदनगर

घरचं झालं थोडं.. 

दत्ता इंगळे

नगर तालुका ः  नगर तालुक्‍यातील 109 गावांसाठी 100 ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, त्यांतील 13 पदे रिक्त असल्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रभारी राज्य सुरू आहे. त्याचा परिणाम ग्रामविकासावर होत आहे. 

तालुक्‍यातील 22 गावांचा कारभार धीम्या गतीने सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. तालुक्‍यात 109 गावांचा कारभार पाहण्यासाठी ग्रामविकास खात्याने 100 ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांत 76 ग्रामसेवकांची पदे मंजूर असून, सध्या 65 कार्यरत आहेत. ग्रामविकास अधिकाऱ्यांची 24 पदे मंजूर असून, सध्या 22 अधिकारी कार्यरत आहेत. 

तालुक्‍यात मंजूर पदांपैकी 13 पदे रिक्त असल्याने, या गावांचा कारभार इतर ग्रामसेवकांवर सोपविला आहे. "घरचं झालं थोडं..' या म्हणीप्रमाणे तालुक्‍यातील ग्रामसेवकांची अवस्था झाली आहे. सध्या कोरोनामुळे प्रत्येक ग्रामसेवकासह ग्रामविकास अधिकाऱ्याला गावातच थांबून राहावे लागत आहे.

मात्र, अतिरिक्त गावांची जबाबदारी दिल्यामुळे कामकाज करताना अडचणी येत आहेत. परिणामी, ग्रामस्थांकडून तक्रारींचा पाऊस पडत आहे. ग्रामविकास खात्याने तालुक्‍यातील ग्रामसेवकांची पदे भरावीत, अशी मागणी होत आहे. 

तालुक्‍यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आपण शासनपातळीवर प्रयत्न करणार आहोत. कोरोनाच्या काळात ग्रामसेवकांनी चांगले काम केले असले, तरी त्यात सुसूत्रता आणण्यासाठी व ग्रामसेवकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
- कांताबाई कोकाटे, सभापती, पंचायत समिती, नगर 

(कोट) 
ग्रामसेवकांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने रिक्‍त पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. सध्या शासनाने पदभरती बंद केली आहे. निर्बंध उठवून तातडीने पदे भरण्यासाठी संघटना पाठपुरावा करणार आहे. 
- एकनाथ ढाकणे, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक संघटना  

                          संपादन ः दौलत झावरे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT