One hundred corona patients die in Ahmednagar
One hundred corona patients die in Ahmednagar 
अहमदनगर

नगरमध्ये कोरोनाचे शंभर बळी...आज साडेसहाशे, दहा हजाराकडे वाटचाल

दौलत झावरे

नगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण 646 जण कोरोनाबाधित सापडल्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 9240 झाली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आजअखेरपर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला अाहे. असे असले तरी 5866 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

जिल्ह्यात आज (शनिवारी) दिवसभरात 643 जण बाधित आढळले. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 39, अँटीजेन चाचणीमध्ये 311 व खासगी प्रयोगशाळेत 296 जण बाधित आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 9240 झाला आहे. सध्या 3274 जणांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्हा रुग्णालयातील लॅबमधील तपासणी अहवालात दुपारी बारा वाजता 15 जण बाधित आढळून आले. त्यात पारनेरमधील एक, महापालिका हद्दीत नऊ, कॅन्टोन्मेंट भागातील पाच जणांचा समावेश आहे. सायंकाळी आलेल्या अहवालामध्ये 24 जण बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीतील सहा, नगर ग्रामीण दोन, कोपरगाव एक, जामखेड एक, कॅन्टोन्मेंट एक, श्रीरामपूर सहा, नेवासे एक व पारनेरच्या सहा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत 311 जण बाधित आढळले. त्यात महापालिका हद्दीतील 55, संगमनेर 15, राहात्यात 12, पाथर्डीत 55, नगर ग्रामीणमध्ये सात, श्रीरामपूर 23, कॅन्टोन्मेंट 15, नेवासे चार, श्रीगोंदे 19, पारनेर 12, अकोले 19, राहुरी 16, शेवगाव सहा, कोपरगाव 18, जामखेड पाच व कर्जतमधील 30 रुग्णांचा समावेश आहे. 

खासगी प्रयोगशाळेतील अहवालांमध्ये 296 जण बाधित आढळले. यामध्ये महापालिका हद्दीत 226, संगमनेर तीन, राहाता तीन, पाथर्डी तीन, नगर ग्रामीण 15, श्रीरामपूर चार, कॅन्टोन्मेंट आठ, नेवासे चार, श्रीगोंदे तीन, पारनेर 12, अकोले एक, राहुरी चार, शेवगाव एक, कर्जत आठ व इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 

जिल्ह्यातील 533 जणांना घरी परतले 
जिल्ह्यातील 533 जण आज बरे होऊन घरी परतले. त्यात महापालिका हद्दीतील 177, संगमनेरमधील 35, राहात्यातील दहा, पाथर्डीतील 32, नगर ग्रामीणमधील 22, श्रीरामपूर तेरा, कॅन्टोन्मेंट तेरा, नेवाशातील 20, श्रीगोंदे 60, पारनेरमध्ये 32, अकोले अकरा, राहुरी सात, शेवगाव 44, कोरगाव तेरा, जामखेड 26, कर्जतमध्ये चार, मिलिटरी हॉस्पिटल तेरा व इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT