Corona Patients Sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : कोरोनाचे दिवसभरात नवे एक हजार २७३ रुग्ण

सध्या ११ हजार १८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये गुरूवारी (ता.२७) दिवसभरात एक हजार २७३ नवीन रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर शहरात सर्वाधिक ५६२ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ९१२, खासगी रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत २१० आणि अँटीजेन चाचणीत १५१ रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या तीन लाख ७८ हजार ७६४ झाली आहे. सध्या ११ हजार १८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाच्या पोर्टलवर मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता सात हजार १७८ झाली आहे.

पारनेर तालुका दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तेथे तालुक्‍यात १०० रुग्ण आढळून आले आहेत. नगर तालुका अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर आहे. नगर तालुक्‍यात ७० रुग्ण आढळून आले. संगमनेर ६९, श्रीरामपूर ५५, अकोले ५३, श्रीगोंदे ४०, राहुरी ३०, कोपरगाव १९, पाथर्डी ३३, शेवगाव १५, जामखेड ४३, नेवासे १०, लष्करी रुग्णालय ११, कर्जत ५०, भिंगार छावणी परिषद ५२, बाहेरील जिल्ह्यातील २६ रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनातून बरे झालेल्या एक हजार २५५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तीन लाख ६० हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१५ टक्के झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT