Parner's Red Square bear movement
Parner's Red Square bear movement 
अहमदनगर

पारनेरच्या लाल चौकात धरणे आंदोलन

मार्तंड बुचुडे

पारनेर : शेतकरी विरोधी असलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी  राष्ट्रीय किसान मोर्चा भुमीपुत्र शेतकरी संघटना व इतर सहयोगी संघटनांच्या वतीने पारनेर येथे लाल चौकात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे  सरकार विरोधात या वेळी निदर्शने  केली. आंदोलनात संतोष वाडेकर, राजेंद्र करंदीकर, अविनाश देशमुख,अॅड पी आर कावरे, गुलाबराव डेरे, सुभाष गायकवाड, अशोक आंधळे, सुरेश गायकवाड, संतोष वाबळे, संतोष खोडदे, अमोल ठुबे, अयुबभाई शेख आदि सहभागी झाले होते.

या वेळी  दिल्ली येथे  दहा दिवसापासून सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा व्यक्त करण्यात आला.

शेतकर्‍यांचे आंदोलन दडपणाऱ्या  सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारने देशात केलेले नवीन कृषी कायदे  शेतकर्‍यांसाठी घातक असून, शेतकऱ्यांना  भांडवलदारांचे गुलाम बनविणारे आहेत. त्यासाठी हे कृषी कायदे रद्द करावेत, शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, निर्धारित हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांना शिक्षेची तरतुद करावी अश्या  मागण्या करण्यात आल्या .

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे यांनी आंदोलनात उपस्थित राहुन पाठिंबा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT