People in Shrirampur due to running out of money in ATM 
अहिल्यानगर

श्रीरामपुरात एटीएममध्ये खडखडाट, लोकांच्या खिशात चणचण

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः कोरोनामुळे सर्वत्र स्वच्छतेचे महत्त्व पटले असून, आता सर्व जण स्वच्छतेवर विशेष भर देत आहेत. परंतु, शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी आजही स्वच्छतेचा अभाव दिसतो. नेहमी लोकवर्दळ असलेल्या शहरातील विविध बॅंक परिसरासह विविध भागांतील एटीएम केद्रांत सध्या धुळीसह कागदी कचरा पडून आहे.

शहर परिसरातील अनेक एटीएम केंद्रांमध्ये रोकड संपल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. नेहमीप्रमाणे एटीएम केंद्रे खुली असल्याने ग्राहक केद्रांत जातात. परंतु, मशीनमध्ये पैसे शिल्लक नसल्याने अथवा काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळत नसल्याने रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागते. त्यामुळे ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे. 

सण-उत्सव काळात नेहमी पैशाची गरज अधिक प्रमाणात भासते. बॅंकेतील गर्दी पाहून अनेक जण बॅंकेऐवजी एटीएममधून पैसे काढतात. परंतु, शहरातील अनेक एटीएममध्ये सध्या पैसे उपलब्ध नाहीत. त्यामुळे बॅंकग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यात सण-उत्सवात बॅंकांना सलग सुट्या आल्याने बॅंका बंद आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी एटीएम हा एकमेव पर्याय खुला असतो.

शहर परिसरातील अनेक एटीएम केंद्रे पैशाअभावी खुली आहेत. अनेक एटीएम केंद्रांची नियमित साफसफाई होत नसल्याने, मशीनवर धुळीचा थर साचले आहेत. शहरातील खड्डेमय रस्त्यावरील धूळ थेट रस्त्यालगत असलेल्या एटीएम केद्रांतील मशीनवर साचल्याचे दिसते. तसेच अनेक एटीएम केंद्रात पैसे शिल्लक नसल्याने, पैसे काढण्यासाठी सुरळीत एटीएम सेवा देणारे ठिकाण शोधण्याची परिस्थिती आली आहे. 

शहरातील अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. त्यामुळे सण-उत्सवात पैसे शिल्लक असलेले एटीएमचा शोध बॅंक ग्राहकांकडून घेतला जातो. खड्डेमय रस्त्यावरील धूळ एटीएम मशीनवर साचली आहे. एटीएम केंद्राची नियमित स्वच्छता होत नसल्याने, अनेक एटीएम केंद्रांत धुळीसह कागदी कचरा पडून आहे. त्यामुळे शहरातील एटीएम सेवा सुरळीत करून एटीएम केंद्राची नियमित स्वच्छता करावी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एटीएम वेळोवेळी सॅनिटाईझ करण्याच्या सूचना बॅंकेने संबंधित ठेकेदारांना द्याव्यात, तसेच एटीएम केंद्रासमोर सुरक्षारक्षक नेमून बॅंकव्यवस्थापन विभागाने एटीएम सेवेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी शहरातून होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT