Police officer's wedding invitation to the people
Police officer's wedding invitation to the people 
अहमदनगर

मुलाचा साखरपुडाय पण तुम्ही यायचं नाही, पोलिसाचं आवतान व्हायरल

सतीश वैजापूरकर

राहाता ः मुलाचा साखरपुडा आहे, मात्र तुम्ही काही येऊ नका. घरीच सुरक्षीत रहा आणि आशिर्वाद द्या. कोविडच्या संकटाने माझ्यावर असे काहीसे वेगळे निमंत्रण देण्याची वेळ आणली.

कोविडयोध्दा म्हणून मी गेल्या आठ महिन्यांपासून रस्त्यावर उभा आहे. माझा मुलगा शुभम व त्याची वधु निकीता यांना विवाहबंधनात पहाण्याची इच्छा मी भविष्याच्या चिंतेने थांबवू शकत नाही. एक पिता म्हणून माझी भुमिका समाजावून घ्या... अशा शब्दांत कोविड योध्दा व पिता या दोन्ही भूमिका एकाच वेळी साकार करणारे विरार येथील पोलीस अधिकारी सुरेश वराडे यांचे हे मनोगत सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले.

पोलीस निरीक्षक वराडे हे तालुक्यात दहा वर्षे कार्यरत होते. त्यांनी त्यांच्या येथील मित्र व सहका-यांना त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही अशी साद घातली आहे. त्यांच्या मुलाचा साखरपुडा येत्या गुरूवारी (ता.24) आहे. त्याची माहिती त्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या इष्टमित्रांना दिली आहे.

त्यात म्हटले आहे, तुमच्या शिवाय समारंभाला शोभा नाही. मात्र, कोविड संकटच्या काळात जावे की न जावे असे तुम्हालाही वाटणे स्वाभाविक आहे. कोरोनायोध्दा म्हणून मी गेल्या सहा महिन्यांपासून मैदानात उभा आहे. ही लढाई कधी थांबेल, हे आज तरी सांगता येत नाही. माझे काही सहकारी कोविडने हिरावून नेले. एक वडील या नात्याने मला माझ्या डोळ्यादेखत मुलाने विवाहबध्द व्हावे, असे वाटते. या भावनेतून हा समारंभ आयोजित केला. 

गेल्या आठ महिन्यांत माझे अडोतीस सहकारी कोविडने बाधित केले. रूग्णशय्येवर कोविडला हरवून ते पून्हा माझ्यासोबत मैदानात उभे आहेत. पालघर जिल्ह्यात तर चारशे अधिकारी आणि कर्मचा-यांनी कोविडला हरवून पून्हा लढाई सुरू केली.

या लढाईत माझ्या चार सहका-यांना कोविडने हिरावून नेले. त्यांची नेहमी आठवण येते. मुलाचा पिता म्हणून आता मलाही असे वाटू लागले आहे की डोळ्यादेखत हे दोघे विवाहबध्द व्हावेत. त्यामुळे अशा वातावरणातही हा साखरपुडा आयोजित करण्याची वेळ आली.

खरे तर हा समारंभ करावा की करू नये असे विचार माझ्या मनात सतत यायचे. त्यातून एकदा हा समारंभ लांबणीवर देखील टाकला. मात्र एक पिता या नात्याने मला माझी भूमिका बदलावी लागली. माझ्या भावना आपण लक्षात घ्याव्यात, असा तो मेसेज आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT