Crime News Sakal
अहिल्यानगर

हायप्रोफाइल वेश्‍याव्यवसायावर छापे, ३ महिलांची सुटका; तिघांना अटक

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगर : पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आज (मंगळवारी) उपनगरांपैकी वाणीनगर, तसेच केडगावमध्ये अंबिकानगर येथे हायप्रोफाइल वेश्‍याव्यवसायावर छापे घातले. तीन बंगाली महिलांची तेथून सुटका करण्यात आली असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाइपलाइन रस्त्यावरील वाणीनगर, तसेच कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केडगाव उपनगरातील अंबिकानगर येथे सुरू असलेल्या वेश्‍याव्यवसायाच्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून मिटके यांनी पंचांसमक्ष छापा घातला. परप्रांतीय (बंगाली) तीन महिलांची सुटका करण्यात आली. तोफखाना पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दीपक एकनाथ लांडगे (वय ३०), सागर जाधव या आरोपींविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात, महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पीडित परप्रांतीय (बंगाली) महिलेची सुटका करण्यात आली.

दुसरा छापा केडगाव उपनगरातील अंबिकानगर येथे घालण्यात आला. पोलिस नाईक शाहीद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी योगेश पोपट ओव्हाळ (रा. माळीवाडा) याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथून दोन पीडित परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका करण्यात आली. उच्चभ्रू वस्तीमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन महिलांकडून हायप्रोफाइल वेश्‍याव्यवसाय करवून घेतला जात होता.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक डॉ. सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संपत शिंदे, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळंकी, राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, अमोल शिरसाठ, चेतन मोहिते, गौतम सातपुते, सचिन जाधव, शाहीद शेख, विष्णू भागवत, सुमीत गवळी, दीपक रोहकले, जयश्री सुद्रिक, प्रियंका भिंगारदिवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT