audio clip viral esakal
अहिल्यानगर

नेवाशात पुन्हा 'ऑडिओ बॉम्ब'! पोलिसाचे संभाषण व्हायरल

सुनील गर्जे

नेवासे (जि.अहमदनगर) : येथील पोलीस अधिकारी-वाळूतस्कर (sand smuggler) यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल (audip clip viral) होऊन चोविस तास उलटत नाहीतर नेवाशातील एक पोलीस कर्मचारी (police staff) व एका व्यक्तीचे वाळूचे वाहन सोडण्यासाठी होत असलेली 'डील' व वाळू वाहनांच्या 'मंथली हप्तेखोरीच्या चर्चेची एक ऑडिओ क्लिप शुक्रवार (ता. १३) सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामुळे वाळूचे अर्थकारण चव्हाट्यावर आल्याने महसूल व पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली.

काय आहे या व्हायरल 'ऑडिओ क्लिप' मध्ये?

या व्हायरल 'ऑडिओ क्लिप' मधील कथित एक पोलीस कर्मचारी व एका व्यक्तीत होत असलेल्या चर्चेतून नेवासे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन नेवासे पोलिसांनी पकडले. दरम्यान, हे वाळूचे वाहन पोलिसांनी सोडावे यासाठी मध्यस्थी करणारी व्यक्ती संबंधित पोलिसाला आठ हजार रुपये देउ करतो. मात्र, हा कर्मचारी या वाळू वाहनाचा मागील वीस हजार रुपयांचा 'हप्ता' अजून मिळाला नसल्याने तसेच आठ हजारांत वाहन सोडण्यास असमर्थता दाखवत असून उलट आम्ही मागत असलेली रक्कम न दिल्यास आम्ही गुन्हा दाखल करतो. संबंधित वाळू तस्कराने वाहन वकिलाला चार-पाच हजार रुपये देऊन कोर्टातून सोडावे असाही सल्ला दिला आहे. सलग दुसऱ्या दिवशी तीही पोलीसांचीच ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने आतातर आपला नंबर नाही ना..! अशी शंका नेवासे पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतावत आहे.

चौकशीअंती कारवाई

सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोलीस कर्मचारी व एक व्यक्तीची कथित ऑडिओ क्लिप मिळाली. त्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT