Popatrao_Pawar 
अहिल्यानगर

शेतकऱ्यांनी योग्य बाजारपेठ मिळविण्यावर भर देणे आवश्यक

अनिल चौधरी

निघोज (नगर) : भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून संबोधला जात असला तरी सध्या देशातील शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. यामुळे शेतीला चांगले दिवस आणायचे असतील तर माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात युवा शेतकऱ्यांनी शेतीपिकाची उत्पादकता वाढविण्याबरोबर शेतमालाची योग्य बाजारपेठ मिळविण्यावर भर देणे आवश्यक आहे. शेती करताना माती परीक्षण व बियाणे परीक्षणावर भर दिल्यास शेतीला उज्वल भवितव्य प्राप्त होईल, असा विश्वास आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केला.

पारनेर तालुक्यातील जवळा येथे उज्वला अँग्रो फर्टिलायझर या कृषी उद्योगाचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार निलेश लंके, कृषीभुषण सबाजी गायकवाड, बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे, माजी उपसभापती भाऊसाहेब लामखडे, समितीचे सदस्य अण्णा बढे, सरपंच ठकाराम लंके, उपसरपंच किसनराव रासकर, माजी सरपंच शिवाजी सालके, निघोज नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेव थोरात, संचालक बाळासाहेब लामखडे, रंगनाथ वराळ, किसनराव सुपेकर, संदिप सालके, सचिन वराळ आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पवार म्हणाले, दुषित पाण्यामुळे जसे माणसाचे आरोग्य धोक्यात आले तसे शेतीचे आरोग्य मातीमुळे दुषित झाले आहे. यामुळे शेती करताना माती परीक्षण व बियाणे परीक्षण करणे गरजेचे आहे. आज देशात प्रगतशील शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच आजचा युवक वर्गही शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. यामुळे प्रयोगशील शेती करण्यावर भर दिल्यास व शेतीमालाची योग्य बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेतीला चांगले दिवस येतील. मात्र यासाठी युवा शेतकऱ्यांनी माहिती व तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. महानगर बँकेचे माजी संचालक महादेव वराळ यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ वरखडे यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन वरखडे यांनी आभार मानले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT