Navratri 2024 ahmednagr sakal
अहिल्यानगर

Navratri 2024 : नवरात्रोत्‍सवातील पूजा साहित्याच्या दरात वाढ; बाजारपेठेत गर्दी : चौका-चौकांत मंडळांकडून सजावट

Navratri 2024 : नवरात्रोत्सवात पूजा साहित्याच्या भावात वाढ झाली आहे, यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी वाढल्याने शहरात खरेदीसाठी नागरिकांची उपस्थिती लक्षणीय आहे.

सकाळ वृत्तसेवा

नगर : नवत्रोत्सवास सुरूवात झाली आहे. घटस्थापना करण्यासाठी मंडळांनी चौका-चौकात मंडप उभारणी करून सजावट केलेली आहे. त्यामुळे चौकांमध्ये भक्तिमय वातावरण तयार झालेले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पूजा साहित्याच्या भावात वाढ झालेली दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झालेली नसली, तरी नेते मंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु झालेली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा होणार आहे. शहरातील अनेक प्रभागात आता नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फ्लेक्स उभारून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या उत्सव काळात अनेकांनी दांडी व इतर स्पर्धांचे आयोजन करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या फ्लेक्सवरून दिसून येत आहे.

नवरात्रोत्सवामुळे शहरात खरेदी गर्दी वाढलेली दिसून आहे. नऊ दिवसांच्या उपसामुळे सध्या किराणा दुकानांमध्ये शाबुदाना, भगर, शेंगदाणे आदी साहित्य खरेदी केली जात आहे. या उपसावाच्या साहित्याची रोज लाखो रुपयांची उलाढाल सध्या नगरमध्ये होत असल्याचे व्यावसायिकांमधून सांगण्यात आले. नवरात्रोत्सवामुळे सध्या बाजारपेठेत नवचैतन्य आले आहे. शहरासह जिल्ह्यातून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पितृपक्षामुळे नवरात्रीची खरेदी रखडली होती. घटस्थापनेमुळे गर्दी होऊ लागली आहे. आश्विन प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते.

घटस्थापना करण्यासाठी लागणारे मातीचे सुगड, सप्तमृतिका, लाल वस्त्र, श्रीदुर्गादेवीची मूर्ती, कुंकू, सुपारी, कापूर, हळद, विड्याचे पान, नारळ आदी आवश्‍यक असते. या पूजा साहित्याच्या भावात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झालेली आहे. यामध्ये सुगड्याचे भाव मागील वर्षीपेक्षा यंदा ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. यंदा सुगड्याच्या किमती ७० रुपयांपासून ते १५० रुपयापर्यंत आहे.

ग्राहकांची गर्दी

नववधूच्या घरी नवरात्रोत्सवात फराळ नेण्याची प्रथा आहे. मुलीच्या घरी फराळाबरोरबच पूर्वी स्टोव्ह दिला जात होता. आता स्टोव्हऐवजी इंडक्शन शेगडी भेट दिले जात आहे. स्टीलच्या दुकानांमध्ये भांडे खरेदीसाठी व कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत सुगड्यांच्या किमतीत वाढ झालेली आहे. मागील वर्षी ३० ते ६० रुपयांपर्यंत सुंगड्यांची विक्री होत होते. त्यात आता वाढ झालेली आहे.

-सचिन राऊत, सुगडे विक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT