The price of mutton is Rs.700, fish Rs.400
The price of mutton is Rs.700, fish Rs.400 
अहमदनगर

बाबो, मटण 700, मासे ४०० रूपयांवर, दर वाढल्याने खवय्यांनी केला असा जुगाड

शांताराम काळे

अकोले : नगर जिल्ह्यात "बर्ड फ्लू'चा शिरकाव झाल्याने चिकन, अंड्यांच्या विक्रीत लक्षणीय घट झाली आहे. दुसरीकडे मटण व माशांच्या किंमतीत मात्र मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. मटण 700 रुपये किलो, तर मासे तब्बल 400 रुपये किलोवर गेल्याने खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 

काही गावांत ग्रामस्थ 10 जणांचा ग्रुप करून थेट बोकड विकत घेत आहेत. त्यातून त्यांना 500 रुपये किलो दरानेच मटण पडत आहे. आदिवासी भागात सर्रास हा फंडा राबविला जात असून, त्यातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात, दुसरीकडे ग्राहकांचाही 200 रुपये फायदा होत आहे.

कोरोना संकटाच्या सुरवातीच्या काळात कोंबड्यापासून हा संसर्ग होत असल्याची अफवा पसरली होती. त्यावेळीही कुक्कुटपालकांना मोठा फटका बसला. नंतर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी चिकन, अंडी खाण्याचा सल्ला दिला जाऊ लागला. त्यामुळे पुन्हा एकदा कोंबडीला भाव आला.

अंडी तर मिळतच नव्हती. आदिवासी भागात कोंबडी 500 रुपये, तर अंडी 15 रुपयांवर गेली होती. शहरात तर त्यासाठी आणखी पैसे मोजावे लागत होते. 

कोरोनातून हा व्यवसाय सावरत असतानाच, "बर्ड फ्लू'ची आवई आली. त्यामुळे परत एकदा कोंबडी, अंडी खाण्यासाठी कुणीही धजावत नसल्याचे दिसते. त्यातून कोंबडी 200 रुपये, तर अंडे 5 रुपये झाले आहे.

दुसरीकडे मटण व्यावसायिक गावोगाव बोकड खरेदीसाठी फिरत आहेत. त्याचा फायदा घेत, शेळीपालन करणाऱ्यांनी बोकडाचा भाव साडेतीन हजारांवरून पाच हजारांवर नेला आहे. परिणामी, मटन तब्बल 700 रुपये किलोवर गेले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT