The public service panel headed by MLA Rohit Pawar has defeated the panel of former minister Ram Shinde in the election at Choundi.
The public service panel headed by MLA Rohit Pawar has defeated the panel of former minister Ram Shinde in the election at Choundi. 
अहमदनगर

Gram Panchayat Results : राम शिंदेंना अगोदर विधानसभेला, आता चौंडीतही रोहित पवारांकडून धोबीपछाड

वसंत सानप

जामखेड (अहमदनगर)  : चौंडी (ता.जामखेड) येथील निवडणुकीत आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पँनलने  माजी मंत्री राम शिंदेच्या पँनलचा दारुण पराभव केला आणि शिंदेच्या हातून ग्रामपंचायतीची सत्ताही काढून घेतली. चौंडी येथे झालेले परिवर्तन राम शिंदे करिता मोठा धक्का मानला जातोय.

विधानसभा निवडणुकीनंतर आमदार रोहित पवारांनी कर्जत-जामखेडमधील एक-एक सत्तास्थाने शिंदेंच्या हातून काढून घेतले. दोन्ही तालुक्यातील बहुतांशी संस्थामध्ये सत्ता परिवर्तन झाले. ग्रामपंचायत निवडणुकीतही अनेक ठिकाणी सत्तांतर झाले. चौंडी ही राम शिंदेंची ग्रामपंचायत येथे त्यांचा पँनलचा दारुण पराभव झाला. त्यांच्या विरुद्ध जनसेवा पँनलचे सात उमेदवार निवडून आले.

विजयी उमेदवार अनुक्रमे असे आशा सुनील उबाळे, कल्याण शिंदे, गणेश उबाळे, मालन शिंदे, रेणूका शिंदे, हनुमंत उदमले, सारीका सोनवणे, यांनी जनसेवा पँनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली आणि विजय मिळविला. तर माजी मंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पँनलला विलास जगदाळे व सुप्रिया जाधव या  दोन जागावर समाधान मानावे लागले. माजी मंत्री शिंदे यांच्या पँनलचा दारुण पराभव झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT