Queues of vehicles to sell onions in Nevasa
Queues of vehicles to sell onions in Nevasa 
अहमदनगर

नेवाशात कांदा विकण्यासाठी लागल्या वाहनांच्या रांगा

विनायक दरंदले

सोनई : नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांदावाहतुकीच्या वाहनांची नगर-औरंगाबाद राज्यमार्गावर दोन किलोमीटरपर्यंत रांग लागली. त्यामुळे झापवाडी चौकात अनेकदा वाहतूककोंडी झाली. 

घोडेगाव उपबाजारात सोमवारी (ता. 21) लिलाव झाल्यानंतर, पावसामुळे अडतदारांचा निम्मा कांदा दारातच पडला होता. निर्यातबंदी असतानाही, घोडेगावात चांगला भाव मिळत असल्याने मंगळवारी सायंकाळी कांदा घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली. त्यातून प्रवेशद्वारात एकच गोंधळ उडाला. एकामागोमाग नंबर लावल्याने ट्रॅक्‍टर, ट्रक, टेम्पोची दोन किलोमीटरपर्यंत रांग लागली. 

सततच्या पावसाने बाजार समितीच्या आवारात पाणी साचले असून, दलदल झाली आहे. त्यात शेतकऱ्यांची अडतदाराकडे माल लावायची लगबग सुरू असल्यामुळे आज दुपारपर्यंत आवारात गोंधळ उडाला होता. बाहेरची आवक वाढल्याने आज कोणीही कांदा आणू नये, असे आवाहन करावे लागल्याचे अडतदार सुदाम तागड यांनी सांगितले. 

नऊ कोटींची उलाढाल 
घोडेगाव येथे 60 हजारांहून अधिक कांदागोण्यांची आवक झाली. त्यात क्रमांक एकच्या कांद्यास 3500 ते 4200 रुपये क्विंटल भाव मिळाला. आजच्या लिलावात नऊ कोटींची उलाढाल झाली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT