माजी खासदार प्रसाद तनपुरे sakal
अहिल्यानगर

राहुरी : जिल्हा बँकेने साडेबारा टक्के लाभांश द्यावा; तनपुरे

सभासद संस्थांना साडेबारा टक्के लाभांश देऊन, आर्थिक मदतीचा दिलासा द्यावा

राजेश नागरे

राहुरी : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सभासद संस्थांना सन २०१९-२० व २०२१-२२ आर्थिक वर्षातील लाभांश द्यावा, तो साडेबारा टक्के असावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली आहे.तनपुरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद असलेले साखर कारखाने, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, पतसंस्था, दूध संस्था, गृहनिर्माण संस्था व इतर सभासद संस्थांना सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील लाभांश अद्याप वाटप केलेला नाही. सन २०२१-२२ आर्थिक वर्ष नुकतेच संपले आहे. त्यामुळे दोन्ही आर्थिक वर्षांतील लाभांशवाटपाचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने लवकरात लवकर घ्यावा. सभासद संस्थांना साडेबारा टक्के लाभांश देऊन, आर्थिक मदतीचा दिलासा द्यावा.

शेतकऱ्यांची थकीत दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी योजना राज्य सरकारने राबविली. त्यावेळी विविध कार्यकारी सोसायट्यांनी शासनाच्या अध्यादेशानुसार विहित मुदतीत शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्जमाफीचा जमा-खर्च केला. मात्र, शासनाकडून जिल्हा बँकेला सहा महिने विलंबाने कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली. त्यामुळे या विलंबित कालावधीतील कर्जमाफीच्या रकमेवरील व्याजाची झळ सोसायट्यांना बसू नये, यासाठी बँकेने व्याजाचा भुर्दंड सोसावा, अशी मागणी आपण केली होती. त्यास बँकेने सकारात्मक प्रतिसादही दिला होता. त्यामुळे तोट्यात जाऊ पाहणाऱ्या सोसायट्यांचे पुनरुज्जीवन झाले होते. आता सभासद संस्थांना लाभांश द्यावा, अशी मागणी तनपुरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT